पंढरपूर - आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (19 जुलै) पंढरपुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री दुपारी तीनच्या सुमारास मुंबईतून पंढरपूरसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेदेखील आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत पंढरपुरात पोहचले आहेत.
हेही वाचा - Ashadhi wari : पांडुरंगाच्या महापुजेची तयारी पूर्ण; विठुरायासाठी मंदिर समितीकडून खास पोशाख
कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रेचा सोहळा प्रतिकात्मक साजरा होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम महाराजांसह विविध नऊ संतांच्या पालख्या ठिकठिकाणाहून पंढरपुरात बसमधून दाखल झाल्या आहेत.
मंगळवारी (२० जुलै) पहाटे सव्वादोन वाजता मुख्यमंत्री ठाकरे व कुटुंबीयांचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन होईल. पहाटे दोन वाजून वीस मिनिटे ते तीन या वेळात श्री विठ्ठलाची तर तीन ते साडेतीन या वेळेत रुक्मिणी मातेची महापूजा होईल.
हेही वाचा - संत नामदेव महाराज पालखीसाठी दोन शिवशाही बस सज्ज, आज पंढरपूरमधील वाखरी तळावर होणार दाखल