ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray : "जागतिक पातळीवर भारतीय संघाचा दरारा..."; मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते फुटबॉल स्टेडियमचे उद्घाटन - minister aditya thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरचे उद्घाटन ( Uddhav Thackeray Inauguration Football Center ) करण्यात आले. यावेळी त्यांनी भारतीय संघाचा जागतिक पातळीवर दरारा निर्माण व्हावा, असा विश्वास व्यक्त केला.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray
author img

By

Published : Jan 16, 2022, 3:55 PM IST

मुंबई - नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा भारताचा संघ तयार होईल. तसेच, या भारतीय संघाचा जागतिक पातळीवर दरारा निर्माण व्हावा, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( CM Uddhav Thackeray ) व्यक्त केला. नवी मुंबई, खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ( Uddhav Thackeray Inauguration Football Center ) आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde), पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ), राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत 2022 चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र,या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे."

"खारघर हे शहर भविष्यात स्पोर्टस् सिटी म्हणून नावारूपाला येईल. या ठिकाणी सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी राज्यसरकारडून प्रयत्न केले जातील. तसेच, या मैदानात सराव करणारा भारतीय संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा. जागतिक पातळीवर भारतीय संघाचा दरारा निर्माण व्हावा," असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हेही वाचा - Aparna Yadav Join BJP : मुलायमसिंह यादवांची सून भाजपात प्रवेश करण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.