मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा केली. राम जन्मभूमी बाबरी मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात, वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधावे. तसेच त्यासाठी लवकरच राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करावी, असे सांगितले होते. त्याला अनुसरून पंतप्रधानांनी लोकसभेत या ट्रस्टची घोषणा केली. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कर्तव्य पार पाडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींचे अभिनंदन केले.
हेही वाचा... VIDEO : 'राम मंदिर ट्रस्टची स्थापना निवडणुका डोळ्यापुढं ठेवून नाही, हा तर..'
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ?
'सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन' , अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा... प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी
7 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार...
पंतप्रधानांचे अभिनंदन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपण अयोध्येला जाणार असल्याचे म्हटले आहे. येत्या सात मार्चला आपण अयोध्येत जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.