मुंबई - राज्यात सध्या चर्चेत असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत पोलीस दलातील खांदेपालटाबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही वाझे प्रकरणावर मंगळवारी रात्री उशिरा १२ वाजेपर्यंत बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर आज सकाळी या प्रकरणाशीसंबंधित आणखी बैठक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सचिन वाझे प्रकरण : मुख्यमंत्री ठाकरेंनी आज सह्याद्रीवर बोलावली मंत्र्यांची बैठक - मनसुख हिरेन मृत्यू
राज्यात सध्या चर्चेत असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या प्रकरणात सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे. त्या संदर्भात आज या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.