ETV Bharat / city

Department Funds Allocation : मुख्यमंत्री शिवसेनचा, मात्र सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना - शिवसेनाला सर्वात कमी निधी

राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वाधिक निधी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांना मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP Getting More Fund ) यश मिळाल्याचे दिसत आहे. सर्वात कमी निधी शिवसेनेला ( Shivsena Getting Less Fund ) मिळाला असून कॉंग्रेसला शिवसेनेपेक्षा जास्त (Congress Getting More Funds Than Shivsena ) निधी मिळाला आहे. तर निधी वाटपावरून आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Department Funds Allocation
Department Funds Allocation
author img

By

Published : Dec 17, 2021, 5:42 PM IST

Updated : Dec 17, 2021, 10:29 PM IST

मुंबई - गेल्यावर्षी अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्यानंतर ज्या-ज्या विभागाला निधी वाटप झाला आहे. त्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून ( State Budget Session ) सर्वाधिक निधी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्यांना मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP Getting More Fund ) यश मिळाल्याचे दिसत आहे. सर्वात आश्‍चर्याची बाब म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना त्यासोबत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असताना ( Shivsena Getting Less Fund ) त्यांना फार कमी निधी देण्यात आलेला आहे. शिवसेनेपेक्षा काँग्रेसलाही अधिक निधीवाटप (Congress Getting More Funds Than Shivsena ) झाल्याचं उघड झालं आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचा, वर्चस्व राष्ट्रवादीचं -

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली. संख्याबळाच्या जोरावर मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आले. मात्र, यानंतरच्या काळात प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या राष्ट्रवादीनेच सरकारी निर्णयांमध्ये वरचष्मा राखल्याचे वारंवार दिसून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Leader Sharad Pawar ) या महाविकास आघाडी सरकारचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक ठरले आहेत. याच गोष्टीचा पुन्हा एकदा प्रत्यत आला आहे. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी (CM Uddhav Thackeray) असूनही गेल्या वर्षभरात सरकारकडून विकासनिधी मिळवण्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून शिवसेना या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांचे पूत्र असलेल्या आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray ) यांच्या खात्यालाही मनाप्रमाणे निधी मिळालेला नाही. अर्थसंकल्पात पर्यावरण खात्यासाठी ४२० कोटींची तरतूद असूनही आतापर्यंत फक्त ३ टक्के म्हणजे १४ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

कुठल्या पक्षाला किती निधी? -

पक्ष निधी
शिवसेना - ५६ आमदार ५२ हजार २५५ कोटी
काँग्रेस - ४३ आमदार१ लाख २४ कोटी
राष्ट्रवादी काँग्रेस - ५३ आमदार२ लाख २४ हजार ४११ कोटी

राष्ट्रवादी काँग्रेसला, शिवसेनेच्या तुलनेत चौपट निधी भेटलेला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला जवळपास शिवसेनेच्या दुप्पट निधी मिळवण्यात यश मिळाले आहे.

शिवसेनेने आत्मचिंतन करावे -

या निधी वाटपावरून भाजपाने शिवसेनेला चांगलेच ( Ashish Shelar Critisize Shivsena On Fund Distribution ) कोंडीत पकडले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची किंमत किती आहे, हे या निधी वाटपावरून समजून येते, असा टोलाही भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. याबाबत शिवसेनेने आत्मचिंतन करण्याबरोबरच त्यांनी स्वतःला किती टक्क्यावर आणून ठेवले आहे, याचा विचारसुद्धा त्यांनी करावा, असे अशिष शेलार म्हणाले आहेत.

हेही वाचा - Ajit Pawar MSRTC Strike : सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका -अजित पवारांचा इशारा

Last Updated : Dec 17, 2021, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.