मुंबई : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून आरोग्य सेवेसाठी दिला जाणारा निधी दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासोबतच 700 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' नावाने रुग्णालय तयार करणार असल्याची मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली (CM Eknath Shinde will opened clinics) आहे.
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना - राज्यभरात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या नावाने साक्षी दवाखाने उभारले जाणार असून केवळ मुंबईत दोनशे सत्तावीस रुग्णालय तयार केले जाणार आहेत. यापैकी 50 दवाखाने दोन ऑक्टोबरला सुरू करण्यात आले असून, घराजवळच आरोग्यसेवा नागरिकांना मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. घराजवळच नागरिकांना आरोग्य सेवा मिळाल्यास त्याचा मोठा फायदा नागरिकांना होईल, असं मतही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त clinics name of Balasaheb Thackerayकेलं.
आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण - प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही, त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार, असल्याचे त्यांनी (CM Eknath Shinde will opened clinics) सांगितले.