मुंबई - रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची यावरून फिरकी घेत रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सोशल वॉर होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण - एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या आमदारांना सोबत घेऊन गुजरात, आसामचे गुवाहाटी आणि गोवा असा १० दिवसांचा राजकीय प्रवास केला. राज्यात मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर भाजपसोबत सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. विधानसभेत शिंदे सरकारला १६४ आमदारांनी पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर भाषण करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० दिवसांचे सत्तांतराचे नाट्य कसे घडले, याचे दाखले देत सभागृहात हशा पिकवला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
-
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
मुख्यमंत्र्यांचे ट्वीट - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना पुन्हा एकदा रिक्षावाल्याची उपमा दिली. यावेळी एका रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट काल सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा चिमटा काढला. तसेच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक ओढले. उद्धव ठाकरे यांनी यावरून शिंदे यांना टार्गेट करताना, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, अशा शब्दांत डिवचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सोशल मीडियावरून उद्धव ठाकरे यांना कानपिचक्या दिल्या. रिक्शाच्या स्पीड पुढे मर्सडीजचा स्पीड फिका पडला, असा टोला लगावला. तसेच हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे सांगत राजकारणापेक्षा महाराष्ट्रला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सूचक ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा - Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla : जीवन धन्य करणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; जाणून घेऊया इतिहास