ETV Bharat / city

'सावरकरांची बदनामी होत होती पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Pro Hindu

महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी होत असूनही आम्हाला काही बोलता येत नव्हते. आमची गळचेपी होत होती. मात्र, आमचे हे सरकार स्थापन करतानाचा मूळ अजेंडा हा हिंदूत्व हाच आहे. हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केले आहे. मंगळवारी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
author img

By

Published : Jul 6, 2022, 7:02 AM IST

Updated : Jul 6, 2022, 7:43 AM IST

मुंबई - नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) हे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला त्यांनी भेट दिली. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. शिंदे यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले व तिथल्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, "हे सरकार स्थापन करताना आमचा एक अजेंडा बाळासाहेबांचे हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व असा आहे. मागच्या सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीरांवर अनेक आक्षेपार्ह वक्तव्य होत होती. मात्र, त्यावेळी आम्हाला खुलेपणाने अगदी मनापासून आमचे मत व्यक्त करता येत नव्हते. आमची गळचेपी होत होती. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आम्ही जो काही निर्णय घेतला त्यामधील एक कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर होणारी आक्षेपार्ह विधान हे देखील आहे."

मागील सरकारमध्ये हिंदुत्वावरून आमची गळचेपी होत होती - मुख्यमंत्री शिंदे

इतर धर्माचा तिरस्कार नाही - पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना 'तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलात. यापुढे हे सरकार हिंदूंचे प्रश्नासाठी अधिक आक्रमक दिसेल का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "यापुढे आम्ही हिंदूत्वाबाबत आग्रही आणि आक्रमक असू आणि म्हणूनच मी आज इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहे. आमचे हिंदुत्व आहे बाळासाहेबांचे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व आहे. त्यांनी आम्हाला इतर कोणत्याही धर्माचा तिरस्कार अथवा त्यांचा अपमान करण्याची शिकवण दिलेली नाही."

हे हिंदूंचे सरकार - पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "आता हे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदुत्व म्हणजे सर्वसामान्यांचा विकास, इथल्या जनतेचा विकास, त्यांचे प्रश्न सोडवणे, सर्व घटकांना न्याय देणार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. मी याआधी देखील म्हटले होते इथल्या प्रत्येकाला वाटले पाहिजे हे माझे सरकार आहे आपले सरकार आहे. आणि तशाच प्रकारचे काम हे सरकार करेल." असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, 'बंडखोरांना पर्याय शोधण्याचे आदेश', लवकरच महाराष्ट्र दौरा

Last Updated : Jul 6, 2022, 7:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.