ETV Bharat / city

CM Shinde Threat Call : मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा वाढवली - Death threat to Chief Minister Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या ( Death threat to Chief Minister Shinde ) आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आत्मघातकी बॉम्बस्फोटाची उडवून देण्याची धमकी देण्यात ( Chief Minister Eknath Shinde life threatened ) आली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र महिनाभरापूर्वी आले होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 2, 2022, 3:24 PM IST

Updated : Oct 2, 2022, 4:37 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या ( Death threat to Chief Minister Shindeb ) आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आत्मघातकी बॉम्बस्फोटाची उडवून देण्याची धमकी देण्यात ( Chief Minister Eknath Shinde life threatened ) आली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shindeb ) यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र महिनाभरापूर्वी आले होते. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आता धमकीचे फोनही शिंदे यांना आले आहेत. याआधीही नक्षलवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

शिंदे यांना तीन वेळा जीवे मारण्याच्या धमक्या - मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना तीन वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एकदा आषाढी एकादशीला पंढरपूरच्या दौऱ्यावर असतानाही त्यांना मारण्याचा कट रचला गेला होता. गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने ते नक्षलवाद्यांच्याही टार्गेटवर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्य पोलिसांना नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यास सांगितले होते.

धमकी PFI मुळे? दुसरीकडे, एनआयएने राज्यांच्या एटीएस, पोलिस, ईडी यांसारख्या एजन्सींच्या मदतीने पीएफआयच्या विरोधात छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पीएफआयची कार्यालये सील करून या संघटनेचे कंबरडे मोडले जात आहे. अशा स्थितीत त्यांना जीवे मारण्याची धमकी कोण देत आहे? त्यामागे धर्मांध संघटना आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न एजन्सी करत आहेत. पीएफआयवर एनआयए, राज्य एटीएसच्या कारवाईनंतर, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात निषेध केला होता. त्यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्तो 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देताना ऐकू होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत पीएफआय कार्यकत्यांनर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नंतर पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत दाखल केलेल्या गुन्ह्यातून देशद्रोहाची कलमे काढून टाकली.

दरम्यान, पाच तारखेला एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक बीकेसी मैदानावर जमणार आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून जवळपास चार ते पाच लाख लोक येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभाग, पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

Last Updated : Oct 2, 2022, 4:37 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.