ETV Bharat / city

Savitribai Phule Photo Mantralaya मंत्रालयात लागणार महात्मा फुले आणि सावित्रीबाईं फुलेंचा फोटो; मुख्यमंत्र्यांचे आदेश

मंत्रालयात समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा Mahatma Phule and Savitribai Phule photos in mantralaya फोटो लावण्यात येणार आहे. तसे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

Savitribai Phule Photos Mantralaya
Savitribai Phule Photos Mantralaya
author img

By

Published : Sep 6, 2022, 2:44 PM IST

Updated : Sep 6, 2022, 3:21 PM IST

मुंबई मंत्रालयात समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा Mahatma Phule and Savitribai Phule photos in mantralaya फोटो लावण्यात येणार आहे. तसे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

गेली अनेक वर्ष मंत्रालयाच्या आवारात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांचे छायाचित्र लावण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर दर्शन स्थळी दिसतील अशा ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र लावण्याच्या सूचना मंत्रालय सचिवालयाला केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतेही घोषणा किंवा शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात केलेलं काम हे समाजाला प्रबोधन करणारे आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरामध्ये या दोन्ही महात्म्यांचे छायाचित्र असावे अशी मागणी अनेक वेळा सामाजिक संस्थांकडून करण्यात आली होती.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र लावण्याच्या सूचना आता सध्या मंत्रालय प्रवेशद्वाराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावलेले आहे. या छायाचित्रांना अभिवादन करूनच प्रत्येक जण मंत्रालयात प्रवेश करत असतो. त्याचनुसार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचीही छायाचित्र या प्रदर्शनीय ठिकाणी लावण्यात यावी ही मागणी गेल्या काही वर्षापासून केली जात होती. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे छायाचित्र लावण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कोण होते ज्योतीराव फुळे - भारतात शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. इंग्रज राजवटीमुळे तो अधिकार मिळायला सुरुवात झाली. पुण्यात पहिली मराठी शाळा (सन १८२४)मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काढली होती. या शाळेत गोविंदरावांनी जोतिबांना वयाच्या ७ व्या वर्षी दाखल केले. जोतिबा हे पहिल्यापासूनच कुशाग्र बुद्धीमत्तेचे, कष्टाळू, प्रतिभासंपन्न असल्याने शाळेतील सर्व घटक त्यांनी आत्मसात करायला सुरूवात केली. तोंडी गणिते सोडवणे त्यांना सहज शक्य होऊ लागले त्यांची अभ्यासातील उल्लेखनीय प्रगती पाहून मात्र काहींचा जळफळाट झाला आणि त्यांनी गोविंदराव यांना भडकवले आणि त्यामुळे जोतिरावांच्या हातचे पाटी दफ्तर व दौत लेखणी जाऊन त्या ऐवजी हाती कुदळ खुरपे आले.

सावित्रीबाई फुले यांच्याशी झालं लग्न - जोतिबा तेरा वर्षांचे असताना त्यांचा विवाह सगुनाबाईंच्या पसंतीनुसार सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची चतुरस्त्र नऊ वर्षाची कन्या 'सावित्री' शी (सन १८४०)मध्ये मोठ्या थाटामाटात झाला. पुढे शेतीच्या कामाच्या दिवसात जोतीराव आणि गोविंदराव पहाटे उठून मळ्यात जात फुलझाडांची काळजी घेत. सावित्रीबाई घरातील सर्व कामे आवरून जेवण घेवून मळ्यात जात असे. शेतात सकाळच्या वेळी कामे उरकून जेवण झाले की सर्व मंडळी आंब्याच्या झाडाखाली (जोतीराव, सावित्रीबाई आणि सगुनाबाई) स्वतःची शाळा सुरू करत. जमिनीची पाटी व काकडीची पेन्सिल करून अक्षर गिरवत बसत. (१८४८ साली)मुलींसाठी पहिली शाळा सुरू दोन तीन वर्षांच्या अंतरानंतर गफार बेग मुन्शी आणि ख्रिश्चन मिशनरी लिजीटसाहेब यांच्या मदतीने जोतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले.

स्त्रीवर्ग डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचे कार्य - फुल्यांनी (१८४८ ते १८५२)या कालखंडामध्ये सबंध स्त्रीवर्ग डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचे कार्य केले. ज्या वेळेस युरोपियन देशांमध्ये स्त्रीला मतदानाचा हक्क द्यायचा की नाही, यावर चर्चा व गदारोळ सुरू होता, त्या वेळेस भारतामध्ये स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा हक्कदेखील नाकारलेला होता. फुल्यांच्या मते, स्त्री ही कोणत्याही जाती वा वर्गातली असो, तिला भेदभावाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी काढलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये नऊ मुली शिक्षण घेत होत्या, त्यापैकी सहा ब्राह्मण समुदायातल्या होत्या हेही अत्यंत महत्वाचे आहे.

सत्यशोधक समाजाची स्थापना - जोतीराव हे बोलणारे समाज सुधारक नव्हते, तर प्रत्यक्ष कृती करणारे समाज सुधारक होते. कोणत्याही कर्मकांडाला थारा नसलेला आणि ईश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थाना नाकारून प्रत्येक मानवाला अधिकार देणारा,स्त्री-पुरूष यात भेद न करणारा संपूर्ण समतावादी अश्या 'सत्यशोधक समाजाची स्थापना (२३ सप्टेंबर १८७३)करून धार्मिक गुलामगिरी मोडीत काढण्याचे काम केले.

समस्त मानव जातीला मुक्त करण्याचं महान कार्य केले - महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेवून जीर्णोध्दार केला. छत्रपतींच्या कार्यावर सोप्या भाषेत आठ पोवाडे लिहून छत्रपतींचा प्रेरणादायी इतिहास लोकांपर्यंत पोहचवला. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, ब्राम्हणांचे कसब या ग्रंथातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरीवर प्रहार करून समस्त मानव जातीला मुक्त करण्याचे महान कार्य केले आहे.

हेही वाचा Movie on Mahatma Phule Life : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावरील चित्रपटासाठी सव्वा दोन कोटी रुपये मंजूर

Last Updated : Sep 6, 2022, 3:21 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.