ETV Bharat / city

Uddhav Thackeray Birthday : एकनाथ शिदे यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पक्षप्रमुख उल्लेख टाळला! - उद्धव ठाकरे वाढदिवस

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिंदे यांनी बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय हाडवैर असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray Birthday ) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 27, 2022, 9:09 AM IST

Updated : Jul 27, 2022, 10:07 AM IST

मुंबई- बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कटुता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी सातत्याने शिवसेनेत बंडखोर नेत्यांना उद्देशून गद्दार म्हटलेले आहे. असे राजकीय हाडवैर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी वेळ आल्यावर बोलेने असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( birthday wishes to Uddhav Thackeray ) ट्विटमध्ये म्हटले, की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख पक्षप्रमुख केला नाही. त्यामुळे शिंदे गट यापुढे आक्रमक पवित्रा ठेवत आणखी धक्के देणार असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच केला होत पलटवार-शिवसेनेतून पालापाचोळा बाहेर पडल्याने आता शिवसेना स्वच्छ झाली आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या पहिल्या भागात केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालापाचोळ्यानेच आता इतिहास घडवला असून जनतेला सत्य परिस्थिती माहित आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिंदे यांनी बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि शिंदे गट असा वाद यामुळे रंगला आहे. तर दुसरीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच शिंदे गटावर चौफेर टीका केली.

बाळासाहेबांचे नाव, फोटो लावू नका : शिंदे गट बंडखोर नाहीत हरामखोर आहेत. शिवसेना त्यांना संपवायची आहे. ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडायचे आहे. परंतु, तुमच्यात हिम्मत असेल, तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. तुमच्या हिमतीवर मत मिळवा, प्रत्येकाला आई-वडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवाने त्यांचे आई-वडील सोबत आहेत. त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्यावी आणि मते मागावीत, असा हल्लाबोल चढविला होता.

बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही वारसदार : बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा कोणी केली, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललो आहोत. महाराष्ट्राच्या जनतेनेही ते स्वीकारले आहे. राज्यभरातून जिल्हा जिल्ह्यातून आम्हाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले होते.

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा : बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते, आम्हाला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आशीर्वादाने जे सरकार स्थापन झाले आहे. जे अडीच वर्षांपूर्वी झाले नाही, ती चूक दुरुस्त करीत आहोत. निवडणुकापूर्वी शिवसेना आणि भाजप युती होती. तीच पुढे नेण्याचे प्रयत्न करतोय. सारखं खंजीर खुपसल्याची भाषा केली जाते. त्यावर मी बोलू शकतो, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेत त्यांनी खंजीरची भाषा करू नये. पाठीत खंजीर कोणी खुपसला हे मी योग्य वेळ आली की सांगेन, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.

हेही वाचा-Eknath Shinde vs Uddhav Thackeray: पालापाचोळ्यांनीचं इतिहास घडवला; एकनाथ शिंदेंचा पलटवार

हेही वाचा-CBI : उद्योगपती अविनाश भोसले यांनी कर्जाच्या नावाखाली कोट्यवधीची रक्कम लाटली; सीबीआयचा दावा

हेही वाचा-Uddhav Thackeray : शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होणार? -उद्धव ठाकरे

Last Updated : Jul 27, 2022, 10:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.