मुंबई दहीहंडी उत्सवात Mumbai Dahihandi Festival मानवी मनोरे रचताना थरावरून पडून गोविंदा जखमी होतात. शासकीय रुग्णालयात अशा गोविंदावर मोफत उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला CM Eknath Shinde Give Instructions दिल्या आहेत. दहीहंडीच्या निमित्ताने आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
जखमी गोविंदांवर मोफत उपचार आज दहीहंडी असून, कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार Government Hospitals Give Free Treatment देण्यात यावेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने provide Free Medical Treatment, वैद्यकीय महाविद्यालये , महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार Medical Colleges provide Free Medical Treatment करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून, या वर्षीपासून दरवर्षासाठी लागू राहणार आहे.
जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार दहिहंडीवेळी किरकोळ अपघात झाल्यास गोविंदांवर महापालिका तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. याबाबत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात ही मागणी केली होती. सुनिल प्रभू म्हणाले होते, दहिहंडीमध्ये आम्ही पण गेली अनेक वर्षे गोविंदा म्हणून काम केले आहे. मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना विमा लागू केला. पण, किरकोळ मार लागेल त्यांना महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये जे काही उपचार होतील ते सर्व मोफत करण्याचे निर्देश द्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्णय घेत गोविंदाना दिलासा दिला.
हेही वाचा CBI Manish Sisodiya सीबीआयचे पथक उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी दाखल