ETV Bharat / city

Eknath Shinde On Balasaheb Thackeray : खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्वप्न साकार, अडीच वर्षांच्या कामाचा अनुशेष भरून काढू - एकनाथ शिंदे - आमदार मर्गदर्शन एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांचा शपथ विधी झाल्यानंतर ( Eknath Shinde On Balasaheb Thackeray ) सर्व बंडखोर आमदार मुंबईला परत आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ( Eknath Shinde On BJP ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. यावेळी खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युती ( Eknath Shinde BJP Government ) सरकार स्थापन झाले, असे मत एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Guided MLA ) यांनी व्यक्त केले, तर आपण मिळून राज्याला गतवैभव मिळवून देऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Eknath Shinde On Shivsena ) यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde On Balasaheb Thackeray
बाळासाहेब शिवसेना एकनाथ शिंदे प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 3, 2022, 6:35 AM IST

Updated : Jul 3, 2022, 9:20 AM IST

मुंबई - खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचे सरकार ( Eknath Shinde BJP Government ) आपल्यासमोर आहे. बाळासाहेबांचे स्वप्न ( Eknath Shinde On Balasaheb Thackeray ) साकार झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर, आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक ( Eknath Shinde On Shivsena ) आहेत. आता आपण मिळून महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि अपक्षांसह ५० हून अधिक आमदार सुरत, गुवाहाटी आणि गोवा येथे होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde BJP Government ) यांनी मुख्यमंत्री पदाची, तर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Guide MLA ) यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व बंडखोर आमदार ११ दिवसांनी मुंबईत आले. त्यावेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

  • Maharashtra CM Eknath Shinde-camp's MLAs, Deputy CM Devendra Fadnavis and others held a meeting last night, in Mumbai pic.twitter.com/foX2JXB30a

    — ANI (@ANI) July 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Shiv Sena Workers Loyalty Certificate : शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून घेणार एकनिष्ठेची प्रमाणपत्र

बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले - यावेळी बोलताना, या आधी सावरकरांचा अपमान करणारे सरकार होते, दाऊदसोबत संबंध असणारे लोक सरकारमध्ये होते. हे सारे अस्वस्थ करणार होते. खऱ्या अर्थाने शिवसेना भाजप युतीचे सरकार आले आहे. बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले आहे. आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही, तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय? हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षांच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत. त्यांना कामाचा प्रचंड अनुभव आहे. कठीण कामे सोपी कशी करायची हे त्यांना ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे व भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभारी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

त्यांना बळ देणे ही जबाबदारी - तर भाजप आणि शिवसेना कधी वेगळी होईल असे वाटले नव्हते, पण काही काळ आपण दूर झालो, आता आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचा खरा विचार घेऊन जे सोबत आले, त्यांना बळ देणे ही आपली जबाबदारी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आपल्याला ताकद दिली आहे. आता एकत्र वाटचाल करायची आहे. आता आपण मिळून महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पदाधिकाऱ्यांकडून लिहून घेतले एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र - शिवसेनेचे 39 आमदार आपल्या सोबत नेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जबर धक्का दिला. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आपल्या बाजूने वळवून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत खाली खेचण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. पक्षात झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणारी आहे. मात्र, यापुढे पक्षात बंड होऊ नये यासाठी शिवसेना पक्षाकडून आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडून पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचे प्रमाणपत्र लिहून घेतले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत देखील पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र लिहून घेतले गेल्याची माहिती मिळत ( Shiv Sena Workers Loyalty Certificate ) आहे. या आधीही शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून शिवबंधन बांधले जात होते.

विरोधकांची प्रमाणपत्रावर टीका - पक्षाचा कार्यकर्ता हा विश्वासावर चालत असतो. शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या प्रेमाने शिवसेनेच्या जवळ आहेत. शिवसैनिकांकडे असलेले शिवबंधन हे खरे आहे. 20 रुपयांचा वडापाव खाणाऱ्या कार्यकर्त्याला 100 रुपयांचे प्रमाणपत्र बनवायला लावणे योग्य नसल्याची खरमरती टीका बंडखोर आमदार गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर केली आहे.

हेही वाचा - CM With Rebel MLA : बंडखोर आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्यातून निघाले

Last Updated : Jul 3, 2022, 9:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.