ETV Bharat / city

Eknath Shinde on BMC Work : महापालिकेसह शिवसेनेच्या कामांची मुख्यमंत्र्यांकडून स्तुती, भाजपाला दणका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी शपथ घेतल्यापासूनच कामांचा धडाका लावला आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबईत धुंवाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या कामांची पाहणी करीत नालेसफाईची कामे चांगली झाल्याचे सांगितले. भाजपने ( BJP ) या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आरोपांचे नंतर पाहून घेऊन आधी चांगली कामे करू असे स्पष्टपणे सांगितले.

CM At BMC Headline
CM At BMC Headline
author img

By

Published : Jul 6, 2022, 8:43 AM IST

Updated : Jul 6, 2022, 9:06 AM IST

मुंबई - मुंबईमध्ये पाऊस पडला की पाणी साचते. पाणी साचले की नालेसफाई ( work of BMC for Nalesafai ) योग्य प्रकारे झाली नसल्याचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे यंदा पाऊस पडला तरी पाणी साचून राहिलेले नाही, असे सांगत पालिकेच्या कामांची स्तुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) केली आहे. तसेच भाजपचे ( BJP ) जे काही आरोप आहेत त्यावर नंतर बघू, निगेटिव्ह बोलण्यापेक्षा चांगलं करुया, असे म्हणत शिवसेनेच्या कारभाराला क्लीनचिट दिली. यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाला दणका दिल्याची चर्चा आहे.

पालिकेचे काम चांगले - मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईचे जनजीवन अस्त्यव्यस्थ झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासह आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पालिकेच्या वॉर रुममध्ये आढावा घेतला. मुंबईत लावलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे मुंबईची पाहणी केली. २०० पेक्षा जास्त पाणी साचण्याची ठिकाणे आहेत. ती आता कमी झाली आहेत. हिंदमाता येथे पाणी साचून राहायचे, पण आता ते कमी झाले आहे. पालिकेने पम्पिंग स्टेशन उभारली, पंप लावले, इतरही उपाययोजना केल्या. यामुळे पाणी जास्त वेळ साचून राहिले नाही. हे पालिकेने केलेल्या कामामुळे झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांवर उपाय म्हणून पालिकेने काँक्रिटीकरणाचे काम लॅबकर पूर्ण करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

रेल्वे बंद पडल्यास बेस्ट, एसटी बसेस - रेल्वेच्या हद्दीत २५ ठिकाणे अशी आहेत ज्या ठिकाणी पाणी साचले की लोकल ट्रेन बंद होऊन प्रवाशांना होतो. प्रवाशांना घरी परतण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी अशा ठिकाणी बस आणि एसटीची व्यवस्था केली जाईल. पालिकेने बेस्टच्या बसेस उपलब्ध कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. धोकादायक इमारतींना पालिका नोटीस बजावते. त्यामधील नागरिकांना पालिका तात्पुरता निवारा उभारते. जीव महत्वाचा असल्याने या निवाऱ्यांमध्ये नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. खासदार, आमदार नव्हे एखाद्या सामान्य नागरिकांनी तक्रार केली तरी ती त्वरित सोडवली गेली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्या - सकाळपासून पावसासंदर्भात रायगड, रत्नागिरी, पालघर, अमरावतीचे जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो आहे. सकाळी पाऊस जास्त होता. आता कमी झाला आहे. पालक सचिव यांना जिल्ह्यात जाण्याच्या, नागरिकांना त्रास होणार नाही, जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पूर येऊ शकतो अशा ठिकाणच्या ३५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुनर्वसन करण्यासाठी कायदे आहेत त्यापेक्षा जास्त मदत करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नालेसफाईवरून विरोधी पक्षांची टीका - पालिकेच्या नालेसफाईवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनीही आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन पालिका आणि सत्तधारी नियोजन शून्य असल्याचा आरोप केला. यावर ते नंतर बघू असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बोलायचे टाळले. पावसाळा तोंडावर आला असतानाही ( Mumbai Sewerage Cleaning ) अजूनही नालेसफाई झालेली नाही. हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३९ टक्के नालेसफाई झाली आहे. उर्वरित १५ दिवसांत नालेसफाई १०० टक्के पूर्ण होईल, असे वाटत नाही. त्यामुळे यंदाही मुंबई शहरात पाणी साचणार असल्याची भीती पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ( Ravi Raja Tweet On Mumbai Sewerage Cleaning ) ट्विट करून व्यक्त केली होती.

हेही वाचा - Devendra Fadnavis On Shinde Shivsena : एकनाथ शिंदेची शिवसेना वैचारिक, उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार- देवेंद्र फडणवीस

Last Updated : Jul 6, 2022, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.