ETV Bharat / city

Rebel Shivsena Mla : शिवसेनेच्या आमदारांचे मुंबईत आगमन; 11 दिवस, 4 शहरं, 4 हॉटेल....ओक्केमध्ये - शिवसेना आमदार मुंबईत

तब्बल ११ दिवसांनंतर बंडखोर आमदार विमानाद्वारे मुंबईत परतले ( Rebel Shivsena Mla Arrived At Mumbai ) आहेत. हे सर्व आमदार ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये राहणार आहेत.

rebel shivsena mla arrived at Mumbai
rebel shivsena mla arrived at Mumbai
author img

By

Published : Jul 2, 2022, 9:15 PM IST

Updated : Jul 2, 2022, 9:46 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत राजकीय भूकंप केला होता. शिंदे यांनी शिवसेनेसह अपक्ष ५० हुन अधिक आमदारांना सुरत, गुवाहाटीमार्गे गोव्याला नेले होते. आज ( 2 जुलै ) तब्बल ११ दिवसांनंतर हे बंडखोर आमदार विमानाद्वारे मुंबईत परतले ( Rebel Shivsena Mla Arrived At Mumbai ) आहेत. हे सर्व आमदार ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये राहणार आहेत. याठिकाणी रात्री त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

बंडखोर आमदार येत असल्याने तगडा बंदोबस्त - शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आणि अपक्ष असे एकूण ५० हुन अधिक आमदार सुरत मार्गे गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्याला गेले होते. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गोव्याहून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व आमदार ताज प्रेसिडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहेत. बंडखोर आमदार मुंबईत येत असल्याने मुंबई विमानतळापासून ताज प्रेसिडंट हॉटेलपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, उद्या ( 3 जुलै ) सकाळी १० वाजता हे सर्व आमदार विधानभवनात अध्यक्ष निवड व सोमवारी बहुमत चाचणीसाठी मतदानात सहभागी होणार आहेत.

एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

भाजपकडून राहुल नार्वेकर - भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker Election 2022 ) निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. राहुल नार्वेकर यांना उभे करून भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडले आहे. कारण राहुल नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजप असा नार्वेकरांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक तशी एक शिवसैनिक विरुद्ध दुसरा शिवसैनिक अशीच होत आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीच्या माध्यमातून शिवसेनेतील ( Shivsena ) आणखी काही मते फोडण्याचा भाजपची रणनीती आहे.

शिवसेनेचे राजन साळवी - विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker election 2022 ) निवडणुकीसाठी शिवसेनेकडून राजन साळवी ( Rajan Salvi ) यांनी आपला अर्ज भरला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडूनही अर्ज दाखल केला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी म्हटले होते. पण, अखेरच्या क्षणी काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी ( MVA Speaker Election Candidate Rajan Salvi ) यांना पाठिंबा देण्याचे ठरवले, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी - उद्यापासून होणाऱ्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला राज्यपालांनी आपले बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच उद्या विधानसभा अध्यक्षाची देखील निवडणूक पार पडणार आहे. यासाठी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदारांना पक्षाने ठरवून दिलेल्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून व्हीप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करण्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

हेही वाचा - Sharad Pawar : विधानभवनात बंडखोर आमदारांचं मत परिवर्तन होईल?; शरद पवार म्हणाले, 'हे सगळे विचारवंत...'

Last Updated : Jul 2, 2022, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.