ETV Bharat / city

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शलने केले 'असे' काही, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Sep 2, 2021, 4:37 PM IST

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शल गाडी अडवण्याचा प्रयत्न करत होता. ही गाडी थांबली नाही म्हणून तो मार्शल समोर आला आणि त्याने चक्क बोनेटवर चढून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चालकाने गाडी तशीच पुढे नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होत आहे.

Cleanup Marshall's on car Bonnet viral video mumbai
मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शलने केले असे काही

मुंबई - आतापर्यंत वाहतूक व्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांना वाहन धारकांच्या बोनेटला पकडून फरफटत जाताना आपण पाहिले आहे. मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी क्लीनअप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. अशीच एक कारवाई करताना क्लीनअप मार्शल बोनेटला पकडून फरफटत जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

विनामास्क वाहनांवर करत होते कारवाई -

मुंबईत गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून पालिकेने मास्क लावणे सक्तीचे केले आहे. मास्क लावला नसेल किंवा रस्त्यावर थुंकल्यास दंड वसूल केला जातो. त्यासाठी पालिकेने विभागवार क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. विनामास्क नागरिकांकडून 200 रुपये तर रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून एक हजार रुपये इतका दंड वसूल केला जात आहे. त्यासाठी क्लीनअप मार्शल तैनातही करण्यात आले आहेत.

कारवाईचा व्हिडिओ झाला व्हायरल -

क्लीनअप मार्शल नागरिकांशी गैरवरवणूक करत असल्याचे प्रकार या आधी समोर आले होते. मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई करण्यासाठी क्लिनअप मार्शल गाडी अडवण्याचा प्रयत्न करत होता. ही गाडी थांबली नाही म्हणून तो मार्शल समोर आला आणि त्याने चक्क बोनेटवर चढून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चालकाने गाडी तशीच पुढे नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होत आहे. हा व्हिडिओ सांताक्रूझ विभागातील असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा - यशस्वी अभिनेता असूनही सिध्दार्थला होते या गोष्टींचे व्यसन.... या 10 महत्वाच्या घटामोडींनी बदलले आयुष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.