मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाचे ( Mumbai High Court ) मुख्य न्यायमूर्ती यांच्या नावाने व्हॉट्सअॅपवर ( WhatsApp SMS ) मेसेज पाठवणाऱ्या भामट्या आरोपीला उत्तर प्रदेश मधून आझाद मैदान पोलिसांकडून अटक ( Accused arrested ) करण्यात आली आहे. आरोपीने आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने मेसेज पाठवल्याची तक्रार आझाद मैदान पोलिसांत करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.
अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज - मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश असल्याचा बनवा करत आरोपी मैकुलाल चंदनलाल दिवाकर ( वय - 34 ) याला आझाद मैदान पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथील भोजपुराचा रहिवासी आहे. तक्रारदार उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कार्यालयात कार्यरत दिलीपकुमार कुलकर्णी यांना 26 जून रोजी अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला होता. या प्रकरणाची माहिती आजाद मैदान पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांकडून तातडीने तपास सुरू केला होता.
अॅमेझॉन गिफ्ट कार्डचा संदेश - या व्हॉट्सअॅप प्रोफाइलमध्ये उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीचे नाव व छायाचित्राचा गैरवापर केला आहे. आरोपीने कुलकर्णी यांना अॅमेझॉन गिफ्ट कार्डचा संदेश पाठवला होता. त्याच्या सहाय्याने आरोपीने आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आझाद मैदान पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती. तपासादरम्यान संबंधित भ्रमणध्वनी बरेली येथील मैकुलाल दिवाकर याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. पण आरोपीने गुन्ह्यांत वापरलेले सिमकार्ड बंद केले होते. त्याऐवजी दुसरे सीमकार्ड वापरत होता.
आरोपीविरोधात 2 ठिकाणी गुन्ह्यांची नोंद - त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या सिमकार्डही तपशील मिळवून त्याला बरेली येथून अटक केली आहे. त्याला नंतर मुंबईत आणण्यात आले आहे. आरोपीविरोधात नागपूरसह 2 ठिकाणी अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. प्राथमिक पाहणीत आरोपीच्या मोबाइलमधील गॅलरीमध्ये व्हॉट्सअॅप क्लोनिंग व दुसऱ्या मोबाइलची वैयक्तिक माहिती कशी मिळवायची याबाबतच्या चित्रफीत आहेत. त्याच्याच सहाय्याने आरोपी फसवणूक करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.