मुंबई - होळीनिमित्त विविध प्रकारचे संदेश देणाऱ्या होळ्या आपण पाहिल्या असतील. असेच एक सामाजिक संदेश देणारी होळी सायनमधील प्रतीक्षा नगर येथील तरुणांनी तयार केली आहे. यात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. युद्ध ही संकल्पनाच मानवजातीसाठी हानीकारक आहे. युद्धामुळे प्रचंड महागाईचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यात जर अणू युद्ध झाल्यास संपूर्ण जगच उध्वस्त होईल आणि जे वाचतील ते शंभर वर्ष मागे जातील, त्यामुळेच युद्ध नकोच, अशी भावनाही या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अणुबॉम्बचा निषेध म्हणून ही कलाकृती
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर न्यूक्लियर बॉम्ब म्हणजेच अणुबॉम्बचा निषेध म्हणून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. होळी रूपी अणुबॉम्ब मिसाईलचे आज (गुरुवारी) दहन केले जाईल. सायन प्रतीक्षा नगर येथील कालिका मित्रमंडळाने साकारलेल्या या कलाकृती हटके आहेत. ही कलाकृती येथील रहिवाशांचे आकर्षण ठरत आहे.
हेही वाचा - नवाब मलिक यांच्या जामीनासाठी 3 कोटी रुपयांची मागणी, मुंबई पोलिसात गुन्हा दाखल