ETV Bharat / city

सिनेमागृहांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, मोठे चित्रपट नसल्याने की कठोर नियमांमुळे? - mumbai multiplex open

आज मुंबईतील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक दिसले नाही. प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. नवीन मोठे चित्रपटदेखील प्रदर्शित झालेले नाहीत. प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे जावे असे चित्रपट नसल्यामुळेदेखील आज थंड प्रतिसाद पाहायला मिळाला.

चित्रपटगृहे खुली
चित्रपटगृहे खुली
author img

By

Published : Oct 22, 2021, 5:32 PM IST

Updated : Oct 22, 2021, 5:48 PM IST

मुंबई - राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहे खुली झाली आहेत. मात्र पहिल्याच दिवशी मुंबईतील सिनेमागृहात थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. आज मुंबईतील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक दिसले नाही. प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. नवीन मोठे चित्रपटदेखील प्रदर्शित झालेले नाहीत. प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे जावे असे चित्रपट नसल्यामुळेदेखील आज थंड प्रतिसाद पाहायला मिळाला.

हेही वाचा - निळू फुले : सिनेमात इरसाल पुढारी, खऱ्या आयुष्यातला हळवा माणूस

50% प्रेक्षक उपस्थिती

चित्रपट पाहण्यासाठी मोठी नियमावली असल्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. नियमावलीनुसार आरोग्य सेतू अॅप डाउनलोड केलेल्या किंवा कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच सिनेमागृहात प्रवेश दिला जाणार आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमा पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. अशाप्रकारचे नियम असल्याने चित्रपटगृहांकडे त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते.

चित्रपटगृहे खुली

दिवाळीनंतर वाढू शकतो प्रतिसाद

दिवाळीनंतरदेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत राहिली, तर नाट्यगृहे आणि चित्रपटगृहांना शंभर टक्के खुले करण्याची परवानगी देण्यात येईल. कोरोनाकाळात कलाकारांना खूप काही सहन करावे लागले. त्यामुळे आता कलाकारांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकसंख्या वाढू शकते, अशी शक्यता आहे. या महिन्यात मोठे चित्रपट नसले, तरी नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांना प्रदर्शनाची वाट आहे.

हेही वाचा - EXCLUSIVE : अजिंठा लेणीतील चित्र वाचवण्यासाठी इटलीहून आले होते कलाकार

चित्रपटगृहांमध्ये किती प्रेक्षक येतील?

हिंदीप्रमाणेच मराठीतही २५० चित्रपट बनून तयार आहेत. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत हिंदी, मराठी आणि अन्य भाषिक चित्रपटांमध्ये प्रदर्शनसाठी चढाओढ सुरूच राहणार आहे. याही परिस्थितीत मराठी चित्रपट निर्माते चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस करत आहेत. अर्ध्या क्षमतेने सुरू असलेल्या चित्रपटगृहांमध्ये किती प्रेक्षक येतील, याचीही कल्पना नाही. त्यामुळे निर्माते चिंतेत आहेत.

Last Updated : Oct 22, 2021, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.