मुंबई - बुकी सोनू जलान, केतन तन्ना आणि मुनिर खान या तिघांचा आज सीआयडीकडून (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) जबाब नोंदवण्यात येणार आहे. यासाठी या तिंघांना आज सीआयडीच्या बेलापूर ऑफिस नोंदवण्यात येणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मंगळवारी इडीने आयज इसीआयआर दाखल करताच स्टेट सीआयडी अॅक्शन मोडमध्ये आली आल्याचे दिसून येत आहे.
सोनू जलानसह केतन तन्ना आणि मुनिर खान या तिघांनी मागील आठवड्यात पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून परमबीर सिंग यांनी खंडणी वसूल केल्याची तक्रार दिली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. त्याप्रकरणी त्यांचा आज (बुधवारी) २ वाजता कोकण भवन, नवी मुंबई इथे त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.
सोनू जलान यांनी परमबीर सिंग यांच्यावर 3 कोटी पेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याचा आरोप लावला आहे. सोनू जलान यांच्या म्हणण्यानुसार त्यानं यासंदर्भात अनेकदा लेखी तक्रार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणताही एफआयआर दाखल करण्यात आला नाही. यामुळे आता सोनू जलान यांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली होती. दरवाजा ठोठावण्याची तयारी केली आहे.
काय म्हणाले सोनू जलान -
''माझी तक्रार परमबीर सिंग, राजकुमार कोथमिरे आणि प्रदीप शर्मा यांच्या विरोधात आहे. या तिघांनी मला धमकावले, माझ्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला. माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपयांची खंडणी घेतली. अटकेत असताना मला परमबीर सिंग यांच्या दालनात नेण्यात आले. तिकडे परमबीर सिंग यांनी माझ्याकडून 10 कोटी रुपयांची मागणी केली. मात्र इतके पैसे देण्यासाठी मी नकार दिला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या प्रदीप शर्मा यांनी यात मधस्थी केली होती.
तेव्हा परमबीर सिंग म्हणाले की, प्रदीप शर्मा जे बोलतील ते फायनल करा. नाही तर या प्रकरणी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना त्रास होईल. ही घटना 2018 मध्ये जेव्हा मला खोट्या बेटिंग प्रकरणी अटक केली तेव्हाची आहे'', असे सोनू जलान म्हणाले. माझ्याकडे काही पुरावे असल्याचेही सोनू जलान यांनी म्हटले आहे. 2019 पासून आम्ही डीजी, मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करत आलो आहोत. जर एनआयएने मला बोलावले तर मी त्यांच्याकडे देखील जाईल आणि त्यांना देखील माहिती देईल, असेही सोनू जलान म्हणाले.