मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे(Chief Secretary Sitaram Kunte) यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठविला आहे. सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपत असल्याने राज्य सरकारने त्यांना ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सीताराम कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि ठाकरे सरकार(Uddhav Thackeray) बरोबर निर्माण झालेले चांगले संबंध यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे.
फेब्रुवारीपर्यंत मुख्य सचिवपदी
या निर्णयामुळे सीताराम कुंटे फेब्रुवारीपर्यंत राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम करु शकणार आहेत. सहकारी प्रवीण सिंह परदेशी यांना मागे टाकत त्यांना मुख्य सचिव म्हणून संधी मिळाली. सीताराम कुंटे मूळचे सांगलीचे आहेत. कुंटे यांचे बालपण पाटणा(बिहार) इथे गेले. उच्च शिक्षणासाठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यांचे वडील बिहार केडरचे आयएएस होते. बीए अर्थशास्त्र, एमए अर्थशास्त्र पदवीनंतर 1985 मध्ये कुंटे आयएएस झाले. राज्य शासनात विविध पदांवर काम करताना त्यांना मसुरीच्या आयएएस ट्रेनिंग ऍकॅडमीतर्फे 2013 मध्ये "न्यू यॉर्क'ला विशेष प्रशिक्षणाची संधी मिळाली होती. देशातील मोजक्या आयएएस अधिकाऱ्यांना अशी संधी मिळते. मुंबई महापालिका आयुक्त तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळलेले कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात.
वंदना कृष्णा, देवाशिष चक्रवर्ती, मनुकुमार श्रीवास्तव, सुजाता सौनिक यांची नावेही चर्चेत
वंदना कृष्णा या १९८५ बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार त्या प्रशासनात अग्रेसर आहेत. मात्र वंदना कृष्णा या फेब्रुवारी २०२० रोजी सेवानिवृत्त होत असल्याने केवळ तीन महिन्यांसाठी त्यांना मुख्य सचिवपदी नेमण्यासाठी राज्य सरकारचा कल दिसत नाही. देवाशिष चक्रवर्ती, मनुकुमार श्रीवास्तव हे सुद्धा मुख्य सचिव पदाच्या रांगेत आहेत. १९८६ च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनुकुमार श्रीवास्तव यांचा क्रमांक मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत आहे. त्याच्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या १९८७ बॅचच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे सीताराम कुंटे यांना बढती भेटल्यास मनुकुमार श्रीवास्तव व सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदासाठी फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंना मुदतवाढ! - Chief Secretary Sitaram Kunte to get extension
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे(Chief Secretary Sitaram Kunte) यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठविला आहे. सीताराम कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि ठाकरे सरकार(Uddhav Thackeray) बरोबर निर्माण झालेले चांगले संबंध यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे.