ETV Bharat / city

Mahatma Phule Birth Anniversary : महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीमुळेच आधुनिक भारताचा पाया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - pays tribute to Mahatma Jyotirao Phule

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की महात्मा फुले ( Uddhav Thackeray on Mahatma Phule ) यांच्या सामाजिक क्रांतीमुळेच आजच्या आधुनिक भारताचा पाया घातला गेला. सत्यशोधक चळवळ, लोकशिक्षण, महिला शिक्षण यासाठी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. शोषित-वंचितावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी ( Mahatma Phule work for society ) आवाज उठवला.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 11, 2022, 3:03 PM IST

मुंबई - भारतीय समाजक्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी केली जात आहे. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त ( birth anniversary of Mahatma Jyotirao Phule ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र ( MH CM paid tribute to Phule ) अभिवादन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की महात्मा फुले ( Uddhav Thackeray on Mahatma Phule ) यांच्या सामाजिक क्रांतीमुळेच आजच्या आधुनिक भारताचा पाया घातला गेला. सत्यशोधक चळवळ, लोकशिक्षण, महिला शिक्षण यासाठी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेचले. शोषित-वंचितावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी ( Mahatma Phule work for society ) आवाज उठवला. समाजातील अनिष्ट रुढी व प्रथांना त्यांनी कडाडून विरोध केला. ब्रिटिश राजवटीलाही त्यांनी खडे बोल सुनावले.

महात्मा फुलेंनी दिला उद्यमशीलतेचा संदेश-उद्योग, व्यवसाय आणि शेतीच्या क्षेत्रांतील यशस्वी अशा कामांनी त्यांनी उद्यमशीलतेचा संदेश दिला. पुरोगामी महाराष्ट्राच्या समताधिष्ठित वाटचालीत महात्मा फुले यांचे अमूल्य असे योगदान आहे. राज्यकारभार, जनकल्याण याबाबत महात्मा फुले यांनी घालून दिलेले धडे आजही मार्गदर्शक आहेत. त्यानुसारच आपली वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

समस्त मानव जातीला मुक्त करण्याचं महान कार्य केले - महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेवून जीर्णोध्दार केला. छत्रपतींच्या कार्यावर सोप्या भाषेत आठ पोवाडे लिहून छत्रपतींचा प्रेरणादायी इतिहास लोकांपर्यंत पोहचवला. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, ब्राम्हणांचे कसब या ग्रंथातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरीवर प्रहार करून समस्त मानव जातीला मुक्त करण्याचे महान कार्य केले आहे.

हेही वाचा-Curfew In MP : रामनवमी उत्सवादरम्यान हिंसाचार: पोलिसांनी मध्यप्रदेशात लागू केली संचारबंदी

हेही वाचा-Air Force Deoghar Rescue Operation Video : देवघरमधील रोपवेत अडकले 48 पर्यटक, हवाई दलाने हेलिकॉप्टरमधून केले रेस्क्यू ऑपरेशन

हेही वाचा-Fighting Two Groups at JNU : दिल्ली पोलिसांनी 'JNU'मधील हिंसाचाराप्रकणी एफआयआर नोंदवला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.