ETV Bharat / city

'बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातल्या अडचणी तात्काळ दूर करा' - मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे

वर्षानुवर्षे वरळी, एन.एम.जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा, यादृष्टीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे झालेल्या एका बैठकीत आदेश दिले आहेत.

reconstruction in mumbai
'बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातल्या अडचणी तात्काळ दूर करा'
author img

By

Published : Sep 5, 2020, 12:19 PM IST

मुंबई - वर्षानुवर्षे वरळी, एन.एम.जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा, यादृष्टीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे झालेल्या एका बैठकीत आदेश दिले आहेत.

वरळी येथे बीडीडी चाळीत 9 हजार 600 भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करून ठराविक कालमर्यादेत हे काम पूर्ण झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. याकामी महसूल विभागाकडून आवश्यक तेवढे उपजिल्हाधिकारी किंवा नायब तहसीलदार नियुक्त करण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले.

ना.म.जोशी मार्ग येथे 32 चाळी असून 2 हजार 500 भाडेकरू आहेत. तर नायगाव येथे 42 चाळी आणि 3 हजार 300 भाडेकरू आहेत. त्या ठिकाणच्या पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या तातडीने दूर करून विकासास सुरुवात करावी, तसेच भाडेकरुंचे योग्य स्थलांतर करावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात प्रधान सचिव गृहनिर्माण एसव्हीआर श्रीनिवास यांनी प्रारंभी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत वस्तुस्थिती सांगितली. तसेच या प्रकल्पांची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला असून त्याबाबतही येणाऱ्या अडचणींचा उहापोह त्यांनी केला.

सर्वसामान्यांना घरे मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी या सर्व अडचणी दूर करून कालबद्ध रितीने पुनर्विकास मार्गी लावावा व याबाबत दर काही दिवसांनी आढावा घेत राहावा, अशीही मुख्यमंत्र्यांनी सूचना केली बैठकीत दिली. संबंधित बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारी देखील उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.