ETV Bharat / city

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एक दिवसीय कोकण दौऱ्यावर - कोकण निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग वादळामुळे कोकणात काजू, फोफळी, आंबा आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 13, 2020, 3:01 PM IST

मुंबई - निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांचे कोकण दौरे वाढले आहेत. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही रस्त्यावर उतरणार असून उद्या रविवारी (ता.14) एक दिवसाचा कोकण दौरा आयोजित करून वादळाच्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये मुरुड आणि अलिबाग पट्ट्यात भेटी देणार आहेत.

निसर्ग वादळामुळे कोकणात काजू, फोफळी, आंबा आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसीय कोकण दौरा केला होता.

शरद पवार यांनी त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून कशाप्रकारे मदत करता येईल यावर चर्चा झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या लोकांना पुन्हा उभं कसं करायचं? रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचे झालेले नुकसान कसे भरून काढायचं? तसेच कोकणातील फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा पुन्हा उभ्या करण्याबाबत चर्चा झाली होती.

रायगड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून १०० कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. 'ही सुरुवात आहे. याला पॅकेज म्हणू नका. आम्ही थेट मदतीला सुरुवात केली आहे,' असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले होते.

नुकसान भरपाईचे निकष सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करा

तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गास २५ कोटी जाहीर केले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन दळणवळण तातडीने सुरू करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीज पुरवठा सुरू करावा. अंतर्गत रस्ते दुरूस्त करून घ्या. आता पाऊस सुरू होईल त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. लहान-लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार, मच्छीमार यांना तातडीने मदत करण्याचे मुख्यमंत्र्याचे यापूर्वीचेच आदेश आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.