ETV Bharat / city

'जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत' - मुख्यमंत्री ठाकरे - News about Chief Minister Uddhav Thackeray

राजमात जिजाऊ माँसाहेब यांना जयंतिनिमित्त मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा स्त्रोत असल्याचे म्हटले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray greeted Jijau Maa Saheb
'जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत' - मुख्यमंत्री ठाकरे
author img

By

Published : Jan 12, 2021, 3:26 PM IST

मुंबई - राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले.वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिजाऊ माँसाहेब या आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणाले, संकट काळात न डगमगता धैर्य आणि शौर्याने पुढे जाण्याची प्रेरणा म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वाभिमान जपण्याचा आणि दुर्बल, वंचितांच्या रक्षणाचा मुलमंत्र दिला. रयतेचे राज्य स्थापन व्हावे यासाठी त्यांनी मुत्सद्दीपणा आणि धीरोदात्तपणे पावले टाकली. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीतही जिजाऊ माँसाहेब यांचा करारी बाणा आणि धडाडी प्रेरणादायी अशीच आहे. प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत, वंदनीय राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.