ETV Bharat / city

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री उद्यापासून दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर; 'हे' आहे कारण

राज्यात शिंदे सरकार स्थापन ( Shinde government in the state ) झाल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री उद्यापासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Sep 20, 2022, 2:00 PM IST

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन ( Shinde government in the state ) झाल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. आत्ताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर ( Chief Minister on two day visit to Delhi ) जाणार असल्याचे समजते. दरम्यान रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि राज्यातून गुजरातला गेलेला वेदांता प्रकल्पामुळे सरकार गोत्यात आले आहे. त्यामुळे नवे उद्योगधंदे, प्रकल्प आणण्याबाबत दिल्ली स्तरावर भेटीगाठी घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मिळवला हिरवा सिग्नल : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का देत भाजप सोबत सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या बंडा वेळी भाजपने दिल्लीतून फिल्डिंग लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर सतत दिल्लीवारी करून मंत्रिमंडळ विस्तारासाठी हिरवा सिग्नल मिळवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासाठी तब्बल दीड महिना वाट पाहावी लागली.

शिंदे-फडणवीस सरकार बनले टीकेचे धनी : उर्वरित विस्तार आणि पालकमंत्री अद्याप नियुक्त केलेले नाहीत. विरोधकांनी या मुद्द्यांवरून शिंदे सरकारला खिंडीत गाठले आहे. अशातच राज्यात येऊ घातलेला वेदांतासारखा प्रकल्प तीन कंपनीच्या यादीत नसलेल्या गुजरातला केल्याने शिंदे-फडणवीस सरकार टीकेचे धनी बनले आहे. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकल्पाचे खापर महाविकास आघाडीवर फोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला लवकरच नवा प्रकल्प देणार असल्याचा दावा केला. विरोधकांकडून यावर मुख्यमंत्री शिंदे यांची खिल्ली उडवली जात आहे.

काय असणार दिल्ली दौरा : मुख्यमंत्री उद्यापासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला होता. या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जातो. रखडलेला उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार, राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि महाराष्ट्रात नव्याने उद्योगधंदे, व्यापार आणि प्रकल्प आणण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय स्तरावरील मंत्री, उद्योजक यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची सूचनांचे म्हणणे आहे.

दसरा मेळावा आणि स्क्रिप्ट : येत्या पंधरवड्यावर शिवसेनेचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे. शिवसेनेला अद्याप दसरा मेळावासाठी जागा मिळालेली नाही. शिंदे गटाला एमएमआरडीएकडून बीकेसी मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. दसरा मेळावा होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप शिवसेनेकडून केला जातो आहे. तसेच शिंदे गटाला मिळणाऱ्या स्क्रिप्ट वाचून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्यांवर टीकास्त्र सोडले जात असल्याचा शिवसेना नेत्यांचा आरोप आहे. आता मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने आणि दसरा मेळावा येऊन ठेपल्याने, मेळाव्यात काय बोलावे, काय मुद्दे असतील यावर स्क्रिप्ट घेऊन घेतील, असा खोचक टोला शिवसेना नेत्यांकडून लगावला जातो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.