ETV Bharat / city

CM Eknath Shinde video viral : फोटोग्राफर म्हणतात, 'मुख्यमंत्री हात जोडा' - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

प्रसार माध्यम आणि प्रसिद्धी हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य आणि प्रभावी वापर करणे सगळ्यांनाच जमतं असं नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कधीकधी हसे होऊन जाते. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या बाबतीत आता हा अनुभव येऊ लागला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : Jul 14, 2022, 7:41 AM IST

मुंबई - कॅमेरा, ॲक्शन... ही गोष्ट आता केवळ बॉलीवूड पुरती मर्यादित राहिलेली नाही, तर समाज माध्यममध्ये सर्रास दिसू लागली आहे. अनेक लोकप्रतिनिधी आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचावी, त्यासाठी या माध्यमाचा अतिशय प्रभावीपणे वापर करतात. परंतु, हा वापर करताना आपण केवळ प्रसिद्धीसाठी जाणून बुजून असे करत आहोत. हे उघड झाल्यास त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या बाबतीत अलीकडे ही चर्चा रंगताना दिसू लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल

आता हा आजचा व्हिडिओ पाहा...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांच्या दादर येथील स्मृतिस्थळावर वंदन करण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी वंदन करताना त्यांना प्रसिद्धी माध्यमांसमोर हात जोडायचे ही भान राहिले नव्हते. अखेरीस फोटोग्राफरनी मुख्यमंत्री साहेब हात जोडा, असे सांगावे लागल्याचे या व्हिडिओ ( Video ) आता दिसून येत आहे. योग्य प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात कधीकधी ती अंगलटही येऊ शकते.

मुख्यमंत्र्यांचा गाडीतील व्हिडिओ - मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर आपण किती वेगाने काम करत आहोत, आणि कशा सूचना देत आहोत हे दाखवणारे एकनाथ शिंदे यांचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये नाशिक येथील पावसाचा आणि पूरस्थितीचा अंदाज घेणारा हा व्हिडिओ आहे. यावेळी शिंदे यांना कोणीतरी आता परिस्थितीच पण विचारा असे सुचवताना दिसत आहे. किंवा मिरज येथे वारकऱ्यांना झालेल्या अपघाताबाबत सूचना देतानाचा त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ असेल. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी राज्याची काळजी करणे आणि संबंधितांना सूचना देणे हे अभिप्रेतच आहे. त्यात मुख्यमंत्री काही विशेष कार्य करीत आहेत, असे नाही. मात्र, हे कार्य करत असताना त्याची अशा पद्धतीने प्रसिद्धी मिळवणे हे सवंग लोकप्रियतेचे लक्षण ठरू शकते. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या दुधारी शस्त्राची काळजी घेणे गरजेचे आहे.

पंतप्रधानांच्या व्हिडिओची ही अशीच चर्चा - यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतच्या अनेक व्हिडिओची अशीच चर्चा झाली आहे. मग ते ढोल वाजवताना व्हिडिओ असतील किंवा आपल्या आईचा आशीर्वाद घेतानाचे काढलेले फोटो आणि व्हिडिओ असतील. अत्यंत नाजूक आणि घरगुती प्रसंगांचे ही अशा पद्धतीने प्रसिद्धी मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनाही टीकेचे धनी व्हावे लागले होते.

हेही वाचा - Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.