मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर ( MP Gajanan Kirtikar ) यांची त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी ( Residence in Goregaon ) जाऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच, त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन राजकीय जीवनात पुन्हा एकदा सक्रिय व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
पायावर झाली होती शस्त्रक्रिया : गेल्या आठवड्यात कीर्तिकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याने रहेजा रुग्णालयात त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती. यानंतर तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी कीर्तिकर यांना दिलेला होता. ही शस्त्रक्रिया होऊन नुकतेच त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यात आल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजल्यावर त्यांनी स्वतः आपल्या समर्थक आमदारांच्या साथीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
गजानन कीर्तिकर ठाकरे सोबतच : शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १२ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असले तरीसुद्धा खासदार गजानन कीर्तीकर हे आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.