मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या कुलाबातील घरी जाऊन प्रकृतीची ( Eknath Shinde meet Ratan Tata ) विचारपूस केली. यापूर्वी शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अनेकांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. अनेक जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेत आहेत. आज प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या कुलाबातील घरी जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकृतीची विचारपूस ( Ratan Tata health ) केली. दरम्यान, शिंदे यांनी प्रकृतीचे कारण दिले असले तरी राज्यात उद्योगधंदे वाढवण्याबाबत टाटांसोबत चर्चा ( CM discussion with Ratan Tata ) झाल्याचे समजते. मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सक्रिय राजकारणापासून अनेक वर्ष दूर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात जाऊन भेट घेतली. स्मिता ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
रतन टाटा यांच्या जीवनावर होणार चित्रपट-भारतातील प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योगपती रतन टाटा यांच्या कुटुंबावर हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपट बनणार आहे. टी-सीरीजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. T-Series आणि Almighty Motion Pictures यांनी व्यवसाय जगतातील प्रामाणिक व्यक्ती असलेल्या रतन टाटा यांच्या कुटुंबावर चित्रपट बनवण्यासाठी हातमिळवणी केली आहे. आता रतन टाटा यांचे औदार्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबीयांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.