मुंबई - शिवसेनेतून ( Shiv Sena ) बाहेर पडून कोणताही नेते निवडून येत नाही. खास करून जे नेत्यासोबत गेलेले आमदार किंवा इतर पदाधिकारी निवडून येत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे असे सभागृहाचे भाषण करताना महाराष्ट्र नेते, आमदार अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले. मात्र, माझ्यासोबत आलेल्या शिवसेनेचे 40, तसेच 11 अपक्ष आमदारांना निवडून आणायची जबाबदारी माझी आहे. अशी, प्रतिज्ञा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सभागृहात घेतली. विधानसभेच्या आपल्या भाषणादरम्यान त्यांनी हे मत व्यक्त केलं. शिवसैनिकांना देखील माहिती आहे की, आम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यामुळे सर्वांना निवडून पुन्हा निवडून आणण्याचे जबाबदारी मी घेतो अशी प्रतिज्ञा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.
भाजप सोबत दोनशे जागा निवडून आणू - येणाऱ्या काळात तुम्हाला 50 आमदारांना आणणार नाही. तर, भारतीय जनता पक्ष तसेच आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे जागा निवडून आणू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आम्ही शिवसेना पासून हिंदुत्वाचा पुरस्कार करत आहोत. त्यामुळे शिवसेनेचे आमच्या सोबतच राहतील. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर यांचा विचार आणि पुढे घेऊन चाललो आहोत अस मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
भाजप शिंदे गटाचे सरकार राज्यात स्थापन - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सरकारमधील विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Deputy CM )यांनी त्यांच्या अभिनंदनचा ठराव सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपा युतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्याचे जाहीर केले हा जनतेच्या मनातला कौल होता आम्हाला दूर सारून विचित्र आघाडी करण्यात आली मात्र शेवटी जनतेच्या मनातील सरकार आज स्थापन होत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते विश्वास दर्शक ठराव संमत झाल्यानंतर अभिनंदनच्या ठरावावर ते बोलत होते
शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले-ठाणे जिल्ह्यातील किसन नगर येथील एक शाखाप्रमुख एकनाथ शिंदे आपल्या कार्याने मोठा होतो धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केली त्याचे त्यांना फळ मिळत गेले 2004 पासून त्यांनी चार वेळा सतत आमदारकी मिळवली आहे अतिशय निष्ठावान आणि सच्चा शिवसैनिक असलेल्या एका शिवसैनिकाला आज मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचे पाहून आपल्याला आनंद होत आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले.
आंदोलनांचीदखल घेतली पाहिजे : गेल्या अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या किंवा आवाज उठवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा धडाका लावला होता काही लोक आंदोलन करतात त्यांची आंदोलने योग्य असतात त्याची दखल घेतली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही सरकारने सूडबुद्धीने वागू नये हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणणाऱ्या खासदाराला बारा दिवस तुरुंगात डांबण्यात येते ही अतिशय निंदनीय बाब आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
शिवसेनेचे खरे शिवसैनिक : राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील व्यक्ती आहेत ते लोकांमध्ये राहणाऱ्या आहेत लोकांची कामे करणारी व्यक्ती आहे ते शिवसेनेचे खरे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray)यांच्या विचारांवर चालणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून राज्याच्या विकासाचे निर्णय घेणार. माझ्या दोघांमध्ये कुठेही संघर्ष दिसणार नाही आम्ही कुरघोडीचे राजकारण करणार नाही तर बदल्याच्या भावनेने काम करणार नाही सर्वांना सामावून विकासाचेच राजकारण करणार असा ठाम विश्वास फडणवीस यांनी सभागृहात व्यक्त केला.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा झटका, विधानसभा अध्यक्ष विरोधी याचिकेवर 11 जुलै रोजी निर्णय