मुंबई - ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा ( OBC Political Reservation ) तिष्ठत असलेला मुद्दा आज सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) निकाली काढला आहे. प्राथमिक स्तरावर हा दिलासा आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Chief Minister Eknath Shinde ) फडणवीस यांचे सरकार येताच राज्यभरातील ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याची भावना, भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस ( MLA Suresh Dhas ) यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - OBC Reservation : दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय
भाजपने घेतला होता आक्षेप - बाठिंया आयोगाच्या ( Bathinya Commission ) कार्यपद्धतीवर भाजपने आक्षेप घेतला होता. तोच अहवाल आणि त्यातील शिफारशीना राज्य सरकारने ग्राह्य धरत, सर्वोच्च न्यायालयात मांडला. एकीकडे आरोप केले, दुसरीकडे अहवाल मान्य केले याबाबत धस यांना विचारले असता, कुठल्याही आयोगावरती केवळ भाजपच्या बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूने आक्षेप घेतले होते. त्याचे निराकरण पुढे होईल. त्यावर तात्काळपणे निरीक्षण नोंदवणे योग्य होणार नाही. त्यात सुधारणा करून सविस्तर चौकशीसाठी पाठवला जाईल. परंतु आता ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक होते. ते आज न्यायालयात मांडले. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आधारित निकाल दिल्याने ओबीसींना दिलासा मिळाल्याचे आमदार धस यांनी सांगितले.
हेही वाचा - Deepak Kesarkar : 'मातोश्री, शिवसेना भवनावर दावा केला नाही, परंतु...'; दीपक केसरकरांनी स्पष्टचं सांगितलं