पुणे पुण्यातील कोथरूड येथील चांदणी चौकातील उड्डाणपूल आणि महामार्ग रुंदीकरण करण्याचे काम Work is Underway to Widen the Flyover and Highway सुरू आहे. त्यामुळे तेथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत Traffic Jam Every Day at Chandni Chowk आहे. या वाहतूक कोंडीचा फटका खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही CM Eknath Shinde Himself Affected by Traffic Jam बसला. नवीन पुणे मुंबई महामार्गावरून येणारी वाहने आणि पिंपरी चिंचवडकडून येणारी वाहने त्यामुळे चांदणी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी Pimpri Chinchwad Cause Huge Traffic Jams at Chandni Chowk होत CM Eknath Shinde Convoy Hit by Traffic Jam असते.
वाहतूककोंडीमुळे वाहनांच्या रांगा पाषाणपर्यंत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा सूस येथून ते चांदणी चौकाकडे येत होता. मात्र, चौकातील कोंडीमुळे वाहनांच्या रांगा पाषाणपर्यंत पोहचल्या. त्यात मुख्यमंत्रीही अडकले. या महामार्गाला पर्यायी रस्ता नसल्याने ताफ्याची सुटका कशी करायची, या गोंधळात वाहतूक पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. चांदणी चौक येथील कोंडीसंदर्भात स्थानिक प्रवाशांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढेच तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनीही तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क केला आणि शनिवारी येथील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यास सांगितले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे स्वत: अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे शहर आयुक्तांना आदेश दरम्यान, वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, महामार्ग प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना शिंदे यांनी फोन करून प्रवाशांची समस्या दूर करण्यास मुख्यमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार आज 11.30 वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करणार आहेत, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.