ETV Bharat / city

Shinde Vs Sarnaik: शिंदे गटात बिनसलं..? मुख्यमंत्री शिंदेंचा सरनाईकांना पुन्हा धक्का, युवासेनेतून मुलाला डावलले - अंतर्गत वादाची चर्चा

Shinde Vs Sarnaik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि प्रताप सरनाईक यांच्यातील वाद दिवसागणिक विकोपाला जातो आहे. ओवळा- माजीवाड़ा विधानसभा मतदार संघाचा Ovala Majiwada Assembly Constituency वाद ताजा असतानाच शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या युवा सेनेच्या नवा कार्यकारणीतून सरनाईक यांच्या मुलाला डावलण्यात आले आहे.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
author img

By

Published : Sep 30, 2022, 9:18 PM IST

मुंबई: Shinde Vs Sarnaik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि प्रताप सरनाईक यांच्यातील वाद दिवसागणिक विकोपाला जातो आहे. ओवळा- माजीवाड़ा विधानसभा मतदार संघाचा Ovala Majiwada Assembly Constituency वाद ताजा असतानाच शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या युवा सेनेच्या नवा कार्यकारणीतून सरनाईक यांच्या मुलाला डावलण्यात आले आहे. सरनाईक Pratap Sarnaik यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात असून राजकीय वर्तुळात ही उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

अंतर्गत वादाची चर्चा शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या कार्यकारणी बरखास्त करण्याचा धडाका सुरू केला आहे. नुकतेच शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारणी जाहीर केली. मंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा मुलगा विकास, अर्जुन खोतकर यांचा मुलगा अभिमन्यू, आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज, दिलीप मामा लांडे यांचा मुलगा प्रयाग यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेनेत सक्रीय असलेल्या पूर्वेश सरनाईक यांना डावलण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यातील अंतर्गत वादाची चर्चा आहे. या वादामुळेच पूर्वेश सरनाईक याचा पत्ता कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.

शिंदेंना युवसेनेतून पाठिंबा देणारा पहिला युवालीडर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. शिंदेंच्या बंडखोरीला प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा देत सुरत गाठले. युवसेनेतही यावेळी फूट पडली. ठाण्यातून पूर्वेश सरनाईक यांनी युवसेनेतून पहिला पाठिंबा शिंदे गटाला जाहीर दिला. पूर्वेश हे आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. सरनाईक पुत्राने पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले. शिंदे गटात सरनाईक पुत्राची मोठ्या पदावर वर्णी लागेल, अशी शक्यता असताना शिंदे गटाच्या नव्या कार्यकारिणीतून डिच्चू देण्यात आला आहे. पूर्वश सरनाईक यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.