ETV Bharat / city

Unrestricted celebration : मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली खोचक टीका, म्हणाले,

यंदाचे उत्सव जल्लोषात, धुमधडाक्यात आणि जोरात मुख्यमंत्री (CM Eknath Shinde ) उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) खोचक टीका. निर्बंध मुक्त सण साजरे ( Unrestricted celebration) होत असताना पोलिसांकडून जास्तीचे सहकार्य मागितले आहे. शेवटी आपली परंपरा, संस्कृती पुढे न्यायची आणि वाढवायची आहे. कोविड संकट आणि आर्थिक बंदीमुळे गणेशोत्सव (Ganeshotsav)मंडळांना लावलेले निर्बंध मागे घेतले. राज्यात शिवसेना-भाजप (shivsena-Bjp)युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर येणारे सर्व उत्सव जल्लोषात, उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी गेल्या दोन वर्षात जे नैराश्य, नकारात्मकता पसरली होती ती घालवण्यासाठी सगळेच निर्णय बदलून टाकले.

Chief Minister criticized Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली टीका
author img

By

Published : Sep 9, 2022, 3:35 PM IST

Updated : Sep 9, 2022, 3:50 PM IST

मुंबई - मागील दोन वर्ष कोविडमुळे सार्वजनिक उत्सव साजरे करताना सतत निर्बंध लादले जात होते. मात्र यंदा भाजपा(BJP) आणि शिवसेनेचे(Shivsena) स्थापन झाल्यापासून निर्बंधमुक्त उत्सव (Unrestricted celebration)जल्लोषात, धुमधडाक्यात आणि जोरात साजरे होत आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. तसेच आगामी काळात ही असेच उत्सव साजरे होतील असे सांगताना लोकांना प्रेमाने जवळ करावे लागते, असा चिमटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना काढला.

नवरात्रोत्सवही धुमधडाक्यात : अनंत चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर येथे भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुंबईसह महाराष्ट्रात गणरायाच्या आगमन अतिशय जल्लोषात धुमधडाक्यात झाल्या सरकारने सर्व निर्बंध हटवून टाकले. बिनधास्त, धुमधडाक्याचे गणेशोत्सव साजरा करा, असे आव्हान केले आज दहा दिवस लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गेल्या दोन वर्षानंतर अतिशय जल्लोषात, धुमधडाक्यात साजरा होताना आपण पाहतोय आहे. याचे समाधान, आनंद आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी येणारे सर्व उत्सव जल्लोषात, उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी गेल्या दोन वर्षात जे नैराश्य, नकारात्मकता पसरली होती ती घालवण्यासाठी सगळेच निर्णय बदलून टाकले. त्यामुळे दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होताना पाहायला मिळतोय. पुढील नवरात्र उत्सवही अशाच पद्धतीने साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ऊन, पाऊस वारा कशाचा विचार न करता पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करतात. अशातच यंदा निर्बंध मुक्त सण साजरे होत असताना पोलिसांकडून जास्तीचे सहकार्य मागितले आहे. शेवटी आपली परंपरा, संस्कृती पुढे न्यायची आणि वाढवायची आहे. कोविड संकट आणि आर्थिक बंदीमुळे गणेशोत्सव मंडळांना लावलेले निर्बंध मागे घेतले. शिवाय, परवानगीसाठी येणारा खर्च माफ करून एक खिडकी योजना लागू करण्याचे आवाहन केल्याचेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर टीका : राज्यात सध्या सर्वसामान्यांचे सरकार आहे. मी पुण्यात गेलो होतो तिकडे रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती. फोटो काढायलाही लोक जवळ येत होती. कोणी सेल्फी काढत होते. लोकांना प्रेमाने जवळ घ्यावे लागते, असा अप्रत्यक्ष चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी काढला. तसेच मागील अडीच वर्षात सरकार कोणाचं होतं, कोण चालवत होते हे सर्वांना माहीत आहे. गणराया गणपतीने त्या सर्वांना सुबुद्धी द्यावी, एवढी प्रार्थना करतो. मी कोणावरती टीका करत नाही पण कामातून उत्तर नक्की देणार, असा सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

अनअपेक्षित धडाकेबाज निर्णय घेतले : गेल्या दोन महिन्यात मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी अनपेक्षित असे लोकांच्या हिताचे धडाकेबाज निर्णय घेतले, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चांगले काम करून राज्याला पुढे घेऊन जा, विकास करा, काही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार विकास करायचा असून राज्यातल्या सर्व सामान्य जनतेला न्याय द्यायचं आहे, असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांना १५ लाखात घरे याचे समाधान : पोलिसांना परवडेल अशा किमतीत घर देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचा आनंद आणि समाधान आहे. पोलीस हे कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करतो. ऊना तान्हात, पावसात कशाची तमा न बाळगता कुटुंबापासून दूर राहतो. त्यामुळे त्यांना पंधरा लाखात पोलिसांना घर देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सकाळी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांच्या गणपती मंडळांना भेट देत बाप्पांचे दर्शन घेतले, यावेळी ते बोलत होते.

Last Updated : Sep 9, 2022, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.