मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृहाला विनायक दामोदर सावरकर ( hostel named Vinayak Damodar Savarkar ) यांचे नाव नुकतेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने दिले. व्यवस्थापन परिषदेच्या या निर्णयाला विरोध करत छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून ( Chhatrabharti Student Union Agitation Mumbai ) आंदोलन करण्यात आले. वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी या आंदोलन करण्यात आली. छात्रभारती विद्यार्थी संघटना छत्रपती शाहू महाराज यांचेच नाव विद्यार्थी वसतिगृहाला देण्यात यावे याबद्दल पहिल्या दिवसांपासून आग्रही आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने काल कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळेच वाद चिघळला आहे. छात्रभारती संघटनेने या निर्णयाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले.
छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्यकारध्यक्ष रोहित ढाले यांच्या नेतृत्वात आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना आवारात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला मुंबई विद्यापीठाने विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला याआधीच विरोध केला होता. त्या विरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे प्रशासन यांना देखील निवेदन दिले होते. मात्र मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने कालच सावरकरांचे नाव आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला देण्याचा निर्णय घेतला. छात्रभारतीकडून याला विरोध करण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी आज छत्रपती शाहू महाराज यांचेच नाव आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन केले.
हेही वाचा - Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहाला सावरकरांचं नाव; वाद पेटणार?