ETV Bharat / city

Chhagan Bhujbal Press Conference : 'नुपूर शर्मा म्हणजे भारत नव्हे, त्या एका पक्षाच्या लहान प्रवक्ता आहेत'

नुपुर शर्मा म्हणजे भारत नव्हे, त्या एका पक्षाच्या लहान प्रवक्ता आहेत. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे अरब इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal Press Conference In Mumbai ) यांनी दिली आहे. तसेच भाजपने राज्यसभा निवडणुकीत ( Rajyasabha Election 2022 ) जास्त उमेदवार दिला. मात्र, आघाडीचे उमेदवार निवडून येतील. आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही तयारी करावी लागेल, कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi Government ) उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Chhagan Bhujbal PC
Chhagan Bhujbal PC
author img

By

Published : Jun 8, 2022, 4:05 PM IST

Updated : Jun 8, 2022, 5:25 PM IST

मुंबई - भाजपने राज्यसभा निवडणुकीत ( Rajyasabha Election 2022 ) जास्त उमेदवार दिला. मात्र, आघाडीचे उमेदवार निवडून येतील. आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही तयारी करावी लागेल, कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi Government ) उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal Press Conference In Mumbai ) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. जनता दरबारनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यसभा असो या विधानपरिषद असो यातील घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया

पंकजांना संधी न दिल्याचा परिणाम होईल - पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचले होते. दिलेल्या संधीचं सोनं करेन परंतू त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. संधी द्यायला हवी होती. खडसेंच्या बाबतीत तेच झाले होते. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो, असे सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केले.

नुपुर शर्मा म्हणजे भारत नव्हे - कुठल्याही धर्मगुरूविरुध्द बोललं जाऊ नये. अपमानकारक बोललं जाऊ नये. प्रत्येक धर्माचा आदर राखला गेला पाहिजे. हे आपल्या संविधानात लिहिले आहे. आता जे कुणी धमक्या देत आहेत. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, हे भारताने केलेले नाही. हे भारतातील एका पक्षाच्या कार्यकर्त्यांने केले आहे. त्याची सजा इतर भारतीयांना नको. एखाद्या पक्षात असे माथेफिरू लोक असतात केवळ प्रसिद्धी मिळावी, त्यासाठी काहीजण करत असतात. त्या नुपुर म्हणजे भारत नव्हे, त्या एका पक्षाच्या लहान प्रवक्ता आहेत. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे अरब इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील, असेही छगन भुजबळ म्हणाले.

मुंबईतील उत्तर भारतीयांना मराठी शिकायला सांगा - कृपाशंकर सिंग यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जावा, असे म्हटले आहे. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सगळ्यांनी सर्व भाषा शिकाव्यात. विशेष करुन मुंबईत तर शिकवायचं. उत्तरभारतीय लोक मुंबईत मोठ्याप्रमाणावर आहेत. त्यांना मराठी शिकायला कृपाशंकर सिंग यांनी सांगावे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

हेही वाचा - Complaint Against Nupur Sharma : नुपूर शर्माच्या अडचणीत वाढ; अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Last Updated : Jun 8, 2022, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.