मुंबई - सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना धमकावून खंडणी मागणाऱ्या करुणा शर्मा ( Chargesheet filed against Renu Sharma ) यांची बहीण आरोपी रेणू शर्मा हिच्या विरोधात मुंबई गुन्हे शाखेने शनिवारी (दि.18) रोजी मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाक कथित ब्लॅकमेल आणि खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. रेणू शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
हेही वाचा - APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीरचे दर उतरले; इतर भाज्यांचे दर स्थिर
मुंबई पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण, मोबाईल फोन आणि रोख रकमेसह वस्तूंची यादीही त्यांनी सादर केल्याचे पोलिसांनी सांगितले. रेणू शर्माला इंदूरमधून 20 एप्रिल रोजी अटक करण्यात आलेला होती. रेणू शर्मा हिने आपल्याकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. याविरोधात धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांमध्ये इंदूरला जाऊन रेणू शर्मा हिला ताब्यात घेतले. रेणू शर्मा हिच्याविरुद्ध यापूर्वीही ब्लॅकमेलिंगच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात नोंद आहे.
काय आहे प्रकरण? - धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनुसार, रेणू शर्मा हिने यापूर्वीही त्यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतरच्या काळात तिने ही तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रेणू शर्माने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून धनंजय मुंडे यांना फोन केला. यावेळी तिने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपयांचे दुकान आणि महागड्या मोबाईलची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास तुमची बदनामी करेन, अशी धमकी रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना दिली होती. या धमकीनंतर धनंजय मुंडे यांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले होते. तसेच एक महागडा मोबाईलही पाठवला होता. मात्र, त्यानंतरही रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपयांसाठी तगादा लावला होता.
हेही वाचा - TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यांत पेट्रोल डिझेलच्या दरात एक रुपायांची घट