मुंबई - मुंबईतून रेल्वेने केरळला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. मध्य रेल्वेने एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेषच्या वेळेत बदल केला आहे. एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन या विशेष रेल्वे गाडीच्या पनवेल व कल्याण स्थानकांवर येथील आगमन व सुटण्याच्या वेळेत बदल केले असून आता ही एक्स्प्रेस १५ मिनिटे आधी येणार आहे.
'असा' आहे वेळेत बदल
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन या विशेष रेल्वे गाडीच्या पनवेल व कल्याण स्टेशन येथील आगमन व सुटण्याच्या वेळेत रविवारपासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन या विशेष एक्स्प्रेस पनवेल स्थानकात १२ वाजून २० मिनिटांनी आगमन होणार आहे. तर १२ वाजून २५ मिनिटांनी या गाडीचे प्रस्थान होणार आहे. तसेच कल्याण स्थानकांत १ वाजून २७ मिनिटांनी आगमन होणार आहे. तर १ वाजून ३० मिनिटांनी या गाडीचे प्रस्थान होणार आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर ट्रेन क्रमांक 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन ही विशेष गाडी पनवेल रेल्वे स्थानकात १२ वाजून ३५ मिनिटांनी आगमन होते. तर १२ वाजून ४० मिनिटांनी या गाडीचे प्रस्थान होत आहे. तसेच कल्याण रेल्वे स्थानकावर १ वाजून ४२ मिनिटांनी आगमन होते, तर १ वाजून ४५ मिनिटांनी या गाडीचे प्रस्थान होत आहे. मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे, की या एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन या विशेष रेल्वे गाडीचे सुधारित वेळापत्रक बघूनच प्रवास करावा.