ETV Bharat / city

Apology from Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचे महिला आयोगाला दिलगिरी पत्र - Letter of Apology

भारतीय जनता पक्षाने मुंबईत ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाबाबत काढलेला मोर्चादरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) त्यांना "घरी जा, स्वयंपाक करा" असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याबाबत आता महिला आयोगाकडे (Women Commission) पत्र देऊन चंद्रकांत पाटील दिलगिरी (Letter of Apology) व्यक्त केली आहे.

Chandrakant Patil BJP State President
चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष
author img

By

Published : May 29, 2022, 5:26 PM IST

मुंबई : भारतीय जनता पक्षाने मुंबईत ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाबाबत काढलेला मोर्चादरम्यान अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे त्यांना "घरी जा, स्वयंपाक करा" असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत आता महिला आयोगाकडे पत्र देऊन चंद्रकांत पाटील दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहोत. आपल्या पक्षाने विधानसभेत बारा आमदार तर लोकसभेत पाच महिला खासदार निवडून दिले आहेत.

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, या त्रागाने आंदोलनादरम्यान ग्रामीण वाक्यप्रचार वापरला होता. मात्र, त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे किंवा इतर महिलांना अपमानित व्हावे लागले. यासाठी आम्हाला दुःख आहे, असे पत्र चंद्रकांत पाटील यांनी महिला आयोगाला दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वाक्याबाबत दोन दिवसांत खुलासा करावा, असे पत्र महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांना दिले होते त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे खुलासा केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती. याबाबत काही नागरिक तसेच पुणे शहर लीगल सेलचे सदस्य असलेले अ‍ॅड. असीम सरोदे यांनीही राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. यावरुन त्यांना खुलासा करावा असे पत्र महिला आयोगाने दिले होते

हेही वाचा : NCP Agitation In Thane : राष्ट्रवादीने जाळला चंद्रकांत पाटील यांचा पुतळा, प्रतिमेला जोडे मारत महिलांनी केले आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.