ETV Bharat / city

Chandrakant Patil on Kirit Somaiya Attacked : काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये, चंद्रकांत पाटलांची टीका - चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर टीका

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil on Kirit Somaiya Attacked ) किरीट सोमैया यांच्यावरील हल्ला प्रकरण आम्ही सहजासहजी घेणार नाही, असं सांगत राज्य सरकारवर आसूड ओढले आहेत. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil
author img

By

Published : Feb 10, 2022, 8:03 PM IST

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झालेल्या हल्याला राजकीय रंग येऊ लागलेला आहे. याबाबत भाजपा पूर्णपणे आक्रमक झाली असून एकीकडे किरीट सोमैया या प्रश्नी दिल्लीत दाखल आहेत. तर दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil on Kirit Somaiya Attacked ) हा विषय आम्ही सहजासहजी घेणार नाही, असं सांगत राज्य सरकारवर आसूड ओढले आहेत. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटलांची टीका
26 नोव्हेंबर 2019 ला विश्वासघात करून सत्तेत आले. येत्या 27 फेब्रुवारीला 27 महिने पूर्ण होतील. या सरकारमध्ये परमबीर सिंह, मंत्री अनिल देशमुख, मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. ठाकरे कुटुंबावर आरोप झाले. यात किरीट सोमैयावर हल्ला झाला, हे पहिल्यांदा झाले. हे कशासाठी? राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले, की पोलिसांच्या बदल्यांसाठी मला माजी गृहमंत्री अनिल देशमुख पत्र पाठवायचे, अनिल देशमुख म्हणतात, मला अनिल परब पत्र पाठवायचे, तर दुसरीकडे परमवीर सिंग यांनी आरोप केला आहे, की सचिन वाझेच्या पुन्हा नियुक्तीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्न करत होते. या आरोपातून बरच काही बाहेर पडत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.राजकीय सुड उगवला -संजय राऊत फार बोलत आहेत. पण काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. ईडी आरोप लावत आहेत. त्याबाबत तुम्ही कोर्टात जा, असे पाटील म्हणाले. किरीट सोमय्या यांच्यावर राजकीय सुड उगवला गेला आहे. धमक्या देणे आता फार झाले. हा हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही. केंद्रीय गृहमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. पुणे महानगरपालिकेतील सुरक्षारक्षक हल्ला झाला, तेव्हा झोपा काढत होती का?, असा सवाल पाटील यांनी केला. केंद्रीय पोलिसांना धक्काबुक्की झाली. त्याचा एफआयआर स्वतंत्र नोंदवावा, यासाठी केंद्रीय पोलिसांच्या प्रमुखांनी पुणे पोलीस आयुक्तांना दोन दिवसांची नोटीस दिली आहे. अन्यथा ते कोर्टात जाणार आहेत. कोणापुढे गुडघे टेकायचे हे चित्र आता बदलेले आहे. पुणे महापालिकेच्या सुरक्षेवरवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

काय आहे प्रकरण -

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात ( Pune Covid Hospital Scam ) पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेलेल्या किरीट सोमैया ( Shivsainik Attack On Kirit Somaiya ) यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली व त्यात ते जखमी झाले होते.

हेही वाचा - Kirit Somaiya On Shivsena Attack : शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता; किरीट सोमैयांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.