ETV Bharat / city

60 गुन्हे करणाऱ्या सोनसाखळी चोरला अटक; सोने विकत घेणाऱ्या ज्वेलर्सवरही कारवाई - mumbai chain snatchaing news

लोकल रेल्वेच्या हद्दीत 60 हून अधिक चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या राजू पाटील या अट्टल गुन्हेगाराला जीआरपी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 15 सोनसाखळ्या व 6 सोन्याच्या लगडी असा 11 लाख 57 हजारांचा ऐवज हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे.

chain snatcher arrested in mumbai
60 गुन्हे करणाऱ्या सोनसाखळी चोरला अटक
author img

By

Published : Nov 29, 2019, 6:43 PM IST

मुंबई - लोकल रेल्वेच्या हद्दीत 60 हून अधिक चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या राजू पाटील या अट्टल गुन्हेगाराला जीआरपी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने केलेल्या कारवाईत तब्बल 23 गुन्हे उघडकीस आले असून, यामध्ये 11 लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.

60 गुन्हे करणाऱ्या सोनसाखळी चोरला अटक

शहरातील लोकल रेल्वेच्या, पश्चिम, मध्य व हार्बर मार्गावर गेल्या काही महिन्यात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास जीआरपी पोलिसांची टीम करत होती. अंधेरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या राजू मधुकर पाटील (वय-36) या आरोपीची रिमांड कस्टडी मिळवून जीआरपी पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये आरोपीने गर्दीच्या वेळी चेन स्नॅचिंगचे तब्बल 23 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

आरोपीकडून सोन्याच्या साखळ्या विकत घेणाऱ्या नानासो थोरात या ज्वेलर्सला पोलिसांनी विरार येथून अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 15 सोनसाखळ्या व 6 सोन्याच्या लगडी असा 11 लाख 57 हजारांचा ऐवज हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे.

Intro:मुंबईत लोकल रेल्वेच्या हद्दीत 60 हून अधिक चैन स्नाचिंग सारखे गुन्हे करणाऱ्या राजू पाटील या अट्टल गुन्हेगाराला जीआरपी पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. रेल्वे पोलिसांच्या एसटीएफ ( स्पेशल टास्क फोर्स) टीमने केलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 23 गुन्हे उघडकीस करण्यात आले असून 11 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. Body:मुंबईतील लोकल रेल्वेच्या , पश्चिम , मध्य व हार्बर मार्गावर गेल्या काही महिन्यात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास जीआरपी पोलिसांची टीम करीत होती . अंधेरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या राजू मधुकर पाटील (36) या आरोपीची रिमांड कस्टडी मिळवून जीआरपी पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान आरोपी राजू पाटील याने लोकल रेल्वेच्या हद्दीत गर्दीच्या वेळी चैन स्नाचिंग ( सोनसाखळी चोरी) सारखे तब्बल 23 गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सोन्याच्या साखळ्या विकत घेणाऱ्या नानासो थोरात या ज्वेलर्सला पोलिसांनी विरार येथून अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 15 सोनसाखळी व 6 सोन्याच्या लगडी असा 11 लाख 57 हजारांचा ऐवज हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे.

बाईट - एमएन मकानदार

डिसीपी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.