ETV Bharat / city

Central Railway Rain Water harvesting : मध्य रेल्वेचा 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'च्या माध्यमातून जलसंधारणाचा उपक्रम

मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि हाऊस-कीपिंग व्यवस्थापन विभागाने विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. जलसंधारण, नवीकरणीय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, वनिकरणाद्वारे ग्रीन पॅच विकसित करणे इत्यादी संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जातात.

author img

By

Published : May 27, 2022, 9:39 PM IST

Central Railway Rain Water harvesting
Central Railway Rain Water harvesting

मुंबई - मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि हाऊस-कीपिंग व्यवस्थापन विभागाने विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. जलसंधारण, नवीकरणीय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, वनिकरणाद्वारे ग्रीन पॅच विकसित करणे इत्यादी संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जातात.

पर्यावरण स्नेही उपक्रमामुळे गोड्या पाण्याचा वापर - जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी, मध्यरेल्वे विविध ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग (RWH) पुरवत आहे. जलद शहरीकरणामुळे जमिनीत पावसाचे पाणी झपाट्याने कमी होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या बहुतांश भागात खोदलेल्या कूपनलिकाही पाण्याचे प्रमाण कमी करत आहेत. ज्या भागात पाऊस कमी पडतो, तेथे ही समस्या आणखीनच वाढत जाते. या समस्येवर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पुढाकार घेतला आहे आणि २०२१ मध्ये प्रदान केलेल्या २४ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्ससह त्याच्या कार्यक्षेत्रातील स्थानके, कार्यशाळा, वसाहती इत्यादी विविध ठिकाणी १५८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स प्रदान केले आहेत. यापैकी बहुतेक रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स भुसावळ आणि सोलापूर विभागातील अवर्षण प्रवण भागात प्रदान केले आहेत. जेथे पाऊस कमी पडतो. या १५८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्सपैकी भुसावळ विभागात ७३ युनिट्स आणि त्यानंतर सोलापूर विभागात ५२ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स आहेत. नागपूर विभागात १९ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स, पुणे विभागात ८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स आणि मुंबई विभागात ६ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स ( माटुंगा वर्कशॉप, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोणावळा येथे प्रत्येकी २ याशिवाय, मध्य रेल्वेने मुंबई विभागात रेन वॉटर हार्वेस्टिंगसह ६ सौर संयत्रे (umbrellas), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोणावळा येथे प्रत्येकी 2, इगतपुरी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी एक सौर संयत्र (umbrella) उपलब्ध करून दिले आहेत.

रेन वॉटर हार्वेस्टिंगचे फायदे -

  • पावसाच्या पाण्याचे संवर्धन
  • पाणी झिरपण्यामध्ये सुधारणा आणि पावसाळ्यात पूर आणि पाणी साचून होणारे पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होते
  • आजूबाजूच्या परिसराचा पाणीसाठा वाढवणे आणि जमिनीतील पाण्याचे शुद्ध पाण्याने पुनर्भरण करणे
  • क्षाराचे प्रमाण कमी करून भूजलाची गुणवत्ता सुधारणे, ते पिण्यायोग्य बनवणे आणि बागकाम, साफसफाई, धुणे इत्यादीसाठी वापरण्यायोग्य मातीची धूप रोखणे

हेही वाचा - Aurangabad University Ink Thrown : औरंगाबादमध्ये राडा! उस्मानाबाद स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणाऱ्यांना काळे फासले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.