ETV Bharat / city

Railways for RRB examinees : आरआरबी परीक्षार्थींसाठी मध्य रेल्वेने सुरू केली विशेष गाडी; रेल्वे थांबणार विविध स्टेशनवर

मध्य रेल्वेने (Central Railway) आरआरबी परीक्षेच्या परीक्षार्थींची (Special train for RRB examinees) होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता नागपूर आणि मडगावदरम्यान आरआरबी परीक्षा विशेष गाडी (Special Railway of Central Railway) चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे. आरआरबी परीक्षा विशेष गाड्या वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन, पुणे, सातारा, मिरज, बेळगावी आणि लोंडा स्थानकावर थांबणार आहे.

Special Train for RRB Exam
आरआरबी परीक्षेसाठी विशेष गाडी
author img

By

Published : Jun 11, 2022, 7:59 PM IST

मुंबई : मध्य रेल्वेने आरआरबी परीक्षेच्या परीक्षार्थींची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता नागपूर आणि मडगावदरम्यान आरआरबी परीक्षा विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे. आता या ट्रेन महाराष्ट्रातील विविध स्टेशनवर थांबणार आहेत. ट्रेन क्रमांक ०१०६३ आरआरबी परीक्षा विशेष गाडी नागपूर येथून उद्या सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि मंगळवारी मध्यरात्री १ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

आरआरबी परीक्षा विशेष गाडी : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०१०६४ आरआरबी परीक्षा विशेष गाडी बुधवारी मडगाव येथून दुपारी ३ वाजता सुटेल आणि गुरुवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. या दोन्ही आरआरबी परीक्षा विशेष गाड्या वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन, पुणे, सातारा, मिरज, बेळगावी आणि लोंडा स्थानकावर थांबणार आहे.

विशेष शुल्कासह बुकिंग सुरू : 01063/01064 आरआरबी परीक्षा विशेष गाडीसाठी विशेष शुल्कासह बुकिंग आजपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. ४ द्वितीय आसन श्रेणी आणि २ ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसन श्रेणी अनारक्षित कोच म्हणून चालविण्यात येतील. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

हेही वाचा : रेल्वे सुरक्षा दल ठरते रेल्वे प्रवाशांचे तारणहार; ५ महिन्यांत ३१ जणांना मिळाले जीवनदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.