मुंबई - बहुप्रतिक्षीत ठाणे ते दिवा पाचवा-सहावा रेल्वे मार्गिकेचे काम पूर्णत्वास येत आहे. येत्या आठवड्यात प्रवाशांसाठी ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका खुली होणार आहे. याशिव्या आता मध्य रेल्वेने कुर्ला-परळ पाचवी-सहावी मार्गिकेकडे लक्ष केंद्रित केले असून या मार्गातील भूंसंपादनाचे अडथळे दूर झाले आहेत. या मार्गासाठी आवश्यक दोन हजार ६५६ चाैरस मीटर जमिनीकरिता मध्य रेल्वेने एनटीसीला १२१ काेटी रुपये डिसेंबर २०२१ मध्ये दिले. तसेच या मार्गातील ६४० व्यक्तींचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे- दिवा पाचवी सहावी मार्गिका खुली होताच मध्य रेल्वे कुर्ला-परळ पाचवी-सहावी मार्गिकेचा कामाला लागणार आहे.
कुर्ला-परळ पाचवी-सहावी मार्गिकेकडे लक्ष
मध्य रेल्वेवरील ठाणे दिवा पाचवी सहावी मार्गिकासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-२) चा प्रकल्पाला २००८ मध्ये मान्यता मिळाली होती. तेव्हा या प्रकल्पाचा खर्च ११५ कोटी रुपये अंदाजित होता. मात्र भूसंपादनास झालेल्या विलंबाचा फटका ठाणे दिवा पाचवी सहावी मार्गिकेला बसला होता. जलद प्रवासांचे स्वप्न पूर्ण करणारा प्रवाशांचा ११५ कोटींचा प्रकल्प ५०२ कोटींपर्यंत पोहचला आहे. सध्या ठाणे ते दिवा पाचवा-सहावा रेल्वे मार्गिकेचे काम पूर्णत्वास येत आहे. येत्या आठवड्यात प्रवाशांसाठी ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका खुली होणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर ६० लोकल फेऱ्या वाढणार असून मुंबईकरांचा प्रवास अति जलद होणार आहे. याशिव्या आता मध्य रेल्वेनं कुर्ला-परळ पाचवी-सहावी मार्गिकेकडे लक्ष केंद्रित केले असून या मार्गातील भूंसंपादनाचे अडथळे दूर करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
१२१ काेटी रुपये केले अदा -
मध्य रेल्वेवरील लोकल वाहतुकीसाठी कुर्ला ते सीएसएमटीपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका उभारण्याविषयी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-३) साठी ६२१ कोटी रुपयांची तरतूद आहे. पहिल्या टप्पात कुर्ला ते परळ आणि दुसरा टप्पात परळ ते सीएसएमटी दरम्यानचे काम पुर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यातील कुर्ला ते परळ दरम्यान पाचवी-सहावी रेल्वे मार्गावर टाकण्यासाठी मध्य रेल्वे कामाला लागली आहे. या मार्गासाठी दोन हजार ६५६ चाैरस मीटर जमिन लागणार आहे. गिरण्यांच्या जमिनीसाठी रेल्वेने एनटीसीला गेल्याच महिन्यात १२१ काेटी रुपये अदा केलेत.
भूसंपदनासाठी रेल्वे बाेर्ड प्रयत्न -
कुर्ला ते परळ पाचव्या सहाव्या मार्गिकेतील लागणाऱ्या जमिनीचे अडथळे दूर करण्यात आले आहे. ज्यामध्ये कुर्ला येथील स्वदेशी मिल, धारावी,टाटा पावर(माटुंगा),मुं बई महापालिकेची जागा(माटुंगा) यांचा समावेश आहे. तर उर्वरित जागेच्या भूसंपदनासाठी रेल्वे बाेर्ड प्रयत्न करीत आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया २०१७ मध्ये सुरु झाली.त्यातील बहुतांश खरेदी प्रक्रिया २०२१मध्ये पुर्ण झाल्याची माहीती मध्य रेल्वेचा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - Minister Uday Samant on Exam : ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे - उदय सामंत
Central Railway : मध्य रेल्वेने माेजले १२१ काेटी रुपये; कुर्ला-परळ पाचवी-सहावी मार्गिकेचा अडथळा दूर - कुर्ला-परळ पाचवी-सहावी मार्गिका
मध्य रेल्वेवरील ठाणे दिवा पाचवी सहावी मार्गिकासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-२) चा प्रकल्पाला २००८ मध्ये मान्यता मिळाली होती. तेव्हा या प्रकल्पाचा खर्च ११५ कोटी रुपये अंदाजित होता. मात्र भूसंपादनास झालेल्या विलंबाचा फटका ठाणे दिवा पाचवी सहावी मार्गिकेला बसला होता