मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Paramvir Singh extortion case ) यांच्यावर खंडणीचा आरोप करणारे हॉटेल व्यावसायिक विमल अग्रवाल हे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक ( Central Investigation Agency ) हे मालाड येथील विमल अग्रवाल ( Malad home Vimal Agrawal ) यांच्या घरी पोहोचले आहे.
सोसायटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणेचे ( central agency visits Agrawal home ) पथक सकाळपासून विमल अग्रवाल ( Hotel business owner Vimal Agrawal ) यांच्या घरी अनेक फेऱ्या मारून आले होते. केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक काही तास त्यांच्या घरातच हजर होते. विमल अग्रवाल यांच्या घरातून तपास यंत्रणेला काय मिळाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय तपास यंत्रणेच्या टीमला विमल अग्रवाल यांच्या घरातून कशाचा शोध घ्यायचा होता, याची माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा-परमबीर सिंह अन् शिवसेनेचे साटेलोटे, अतुल भातखळकर यांचा आरोप
कोण आहेत विमल अग्रवाल?
गोरेगावमधील विमल अग्रवाल (Vimal Agrawal) नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमबीर सिंह, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात नोव्हेंबर 2021 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले, की माझे पार्टनरशिपमध्ये गोरेगाव (Goregaon) इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये बीसीबी स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे (Sachin Waze) आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी 2020 पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता. अग्रवाल यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 384, 385, 388, 389, 120 ब आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-Parambir Singh On Sachin Waze : सचिन वाझेवर तुरुंगात रोज अत्याचार, परमबीर सिंह यांचा खळबळजनक आरोप
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख ( Parambir Singh On Anil Deshmukh ) यांच्यावर सचिन वाझेकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यलयावर झापे टाकले होते. ईडीची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.