ETV Bharat / city

महाराष्ट्रात ‘प्लाझ्मा थेरेपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

author img

By

Published : Apr 24, 2020, 6:21 PM IST

Updated : Apr 25, 2020, 9:28 AM IST

कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी देशातील सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी हर्षवर्धन यांनी मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता दिली.

Corona
आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई - राज्य सरकारकडून मागणी करण्यात येत असलेल्या ‘पूल टेस्टिंग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मान्यता दिली. याबाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

याबाबत अधिक माहिती देताना टोपे म्हणाले, की कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी देशातील सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी हर्षवर्धन यांनी मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता दिली. या बैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दाही मांडण्यात आला.

पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. राज्याच्या या सूचनांचे कौतुक ही केंद्रातील आरोग्यमंत्र्यांनी केल्याचे टोपे म्हणाले. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Apr 25, 2020, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.