ETV Bharat / city

गुढीपाडवा अत्यंत साधेपणाने साजरा करा, राज्यपालांचे आवाहन - राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांच्या बद्दल बातमी

गुढीपाडवा अत्यंत साधेपणाने साजरा करा,असे आवाहन राज्यपालांनी केले. त्यांनी यावेळी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 12, 2021, 4:57 PM IST

मुंबई - यंदा महाराष्ट्र,करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतःमहाराष्ट्र, करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. आगामी नवे वर्ष सर्वांकरीता सुख, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो. यावेळी त्यांनी युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.