ETV Bharat / city

'राजगृह'वर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात; पाहा व्हिडिओ - dadar mumbai news today

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी अज्ञातांनी तोडफोड केली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

CCTV footage of attack and vandalism of Rajgruha
राजगृहवर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज
author img

By

Published : Jul 8, 2020, 7:28 PM IST

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान राजगृह येथे असणाऱ्या सीसीटीव्ही क‌ॅमेरातील फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. त्यातून या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने होणार आहे.

राजगृह तोडफोडप्रकरणी एकजण ताब्यात...

'राजगृह'च्या तोडफोडप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस सहआयुक्त विनय चौबे यांनी दिले. तसेच राजगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पाहा व्हिडिओ : 'राजगृह'वर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज...

हेही वाचा - व्हिडिओ : 'राजगृह' म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचा अमुल्य ठेवा

नेमके प्रकरण काय ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी अज्ञातांनी तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. राजगृह या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा आणि झाडांच्या कुंड्या यांची तोडफोड करण्यात आली. ही घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

'राजगृह'च्या घटनेनंतर राज्यातील नेतेमंडळींकडून घटनेचा निषेध आणि कारवाईची मागणी

1. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही : मुख्यमंत्री

'राजगृहाच्या आवारात शिरून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

अधिक वाचा - राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2. प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन

'मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचे काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी' असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

4. आरोपींना अटक करण्याची फडणवीसांची मागणी

'भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे' असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.