मुंबई - दोन वर्षांपूर्वीपासून केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने दहावी आणि बारावीच्या टू टर्म परीक्षा सुरू केली होती. मात्र आता, कोरोना नियंत्रणात आल्याने वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने आता पुढील वर्षापासून टू टर्म परीक्षा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सीबीएसईच्या दहावी-बारावी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नेमकी काय आहे टू टर्म परीक्षा - गेल्या दोन वर्षापूर्वी वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता. विशेष म्हणजे सततच्या लॉकडॉनमुळे शाळांचे नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने वर्ग भरण्यात आले होते. या शिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी वेगवेगळे नियम सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारने केले होते. यातील एक नियम म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने दहावी आणि बारावीच्या टू टर्म परीक्षा सुरू केली होती. ज्यामध्ये सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची पहिली टर्म परीक्षाही डिसेंबर महिण्यात होत होती. तर आता दुसऱ्या टर्मची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरु होणार आहे. आताही टू टर्म परीक्षा पुढील वर्षापासून रद्द करून एकदाच परीक्षा घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळाने अधिकृत घोषणा केली नसली तरी, लवकरच संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची माहिती अधिकारी वर्गाकडून देण्यात आलेली आहे.
30 टक्यांनी अभ्यासक्रम कमी- गेल्यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र मागील वर्षीच्या लेखी परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा आणि आंतरिक मूल्यांकन करून दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर कऱण्यात आलेला आहेत. सीबीएसईच्या अभ्यासक्रमाबाबत गेल्या दोन वर्षात स्वीकारलेले धोरणाच कायम राहणार आहे. ज्यात अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे.
शाळेंच्या निवेदनामुळे निर्णय - केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळातील एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीएसईने दोन टर्म परीक्षेचे स्वरूप कायम राहील असे कधीही जाहीर केलेलं नव्हते. त्याचबरोबर एकच परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याची निवेदन शाळेकडून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आले आहे.
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'टू टर्म एक्झाम' पुढील वर्षापासून रद्द! - exam fever 2022
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची पहिली टर्म परीक्षाही डिसेंबर महिण्यात होत होती. तर आता दुसऱ्या टर्मची परीक्षा 26 एप्रिल पासून सुरु होणार आहे. आताही टू टर्म परीक्षा पुढील वर्षापासून रद्द करून एकदाच परीक्षा घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण महामंडळाने अधिकृत घोषणा केली नसली तरी, लवकरच संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची माहिती अधिकारी वर्गाकडून देण्यात आलेली आहे.