ETV Bharat / city

#coronavirus : 'सीबीएसई'च्या 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांनाही पूढील वर्गात प्रवेश देण्याचे संजय धोत्रेंचे आश्वासन - next class without exam

राज्‍यातील सीबीएसई बोर्डातील शाळांमध्‍ये सुध्‍दा वर्ग 1 ते 8 च्‍या विद्यार्थ्‍यांना पूढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय लवकरच घेणार आहे. असे आश्वासन मानव संसाधन राज्‍यमंत्री संजय धोत्रे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

CBSE
सीबीएसई
author img

By

Published : Apr 1, 2020, 7:17 PM IST

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) द्वारा संचलित राज्‍यातील शाळांमध्‍ये वर्ग 1 ते 8 च्‍या विद्यार्थ्‍यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय लवकरच घेण्‍यात येणार आहे. याबाबतची माहिती भारत सरकारच्या मानव संसाधन विकास राज्‍यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली असून त्यांनी तसे आश्वानही दिले असल्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. सीबीएसईच्या शाळांमध्‍ये शिकणाऱ्या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांच्‍या मागणीनुसार हा निर्णय घेण्‍याची मागणी मुनगंटीवार यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे केली होती.

  • *राज्‍यातील सीबीएसई शाळांमध्‍ये सुध्‍दा वर्ग 1 ते 8 च्‍या विद्यार्थ्‍यांना पूढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय घेणार*
    *मानव संसाधन राज्‍यमंत्री संजय धोत्रे यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्‍वासन* @SanjayDhotreMP @DrRPNishank @BJP4Maharashtra pic.twitter.com/GiUdRgTbkM

    — Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... Coronavirus : दिलासादायक..! पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेची कोरोनावर मात

कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये वर्ग 8 ते 10 पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या परिक्षा न घेता त्‍यांना पुढील वर्षात प्रवेश देण्‍याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सीबीएसई शाळांना अशा कोणत्‍याही सूचना सीबीएसई बोर्डाने दिल्‍या नसल्‍याची बाब पालकांनी सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निदर्शनास आणली होती. मुनगंटीवार यांनी त्‍वरीत याबाबत मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल व राज्‍यमंत्री संजय धोत्रे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून सीबीएसई शाळांना याबाबत स्‍पष्‍ट निर्देश देण्‍याची विनंती केली होती.

संजय धोत्रे यांच्‍याशी मुनगंटीवार यांनी दूरध्‍वनीद्वारे चर्चा केली असता सीबीएसई द्वारा संचलित राज्‍यातील शाळांमध्‍ये वर्ग 1 ते 8 पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देण्‍याचा निर्णय लवकरच घेण्‍यात येईल, अशी माहिती धोत्रे यांनी दिली. राज्‍यातील सीबीएसई शाळांमध्‍ये शिकणाऱ्या विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांनी याची नोंद घेण्‍याचे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.